ग्लोबल

युक्रेन ते भारत विमान भाड्यावरील टीकेनंतर महत्त्वाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युक्रेन-रशियामध्ये सध्या युद्ध सुरु असून चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. खासकरुन भारतातून युक्रेनमध्ये शिकायला गेलेले विद्यार्थी अथवा भारतीय नागरिकांच्या जीविताची काळजी वाढली त्यांना भारतात परत आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून भारतामध्ये नागरिकांना परत आणण्यासाठी इतर काही मार्गांचा विचार केला जातो आहे. दुसरीकडे, युद्धासारख्या संकटाच्या परिस्थितीमध्ये विमान प्रवासाची किंमत ही नेहमीपेक्षा तिप्पट किंमतीने वाढल्याचं दिसून येतंय. यावर अनेक विद्यार्थी आणि नागरिकांनी चिंताही व्यक्त केली आहे. तसेच टीकाही करण्यात आली. त्यानंतर आता सरकारकडून मोठा एअरलिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

वाढत्या तक्रारी लक्षात घेता आता युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी भारत सरकार काही विमानांची व्यवस्था करणार आहे. या विमान प्रवासाचा खर्च सरकार उचलणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थी घरी परतू शकले नाहीयेत. आमच्याकडे नोंदणी केलेल्यांपैकी अनेकांनी युक्रेन ते भारत हा प्रवास करण्यास सक्षम नसल्याचं म्हटलंय. कारण या प्रवासाचे भाडे नेहमीपेक्षा कित्येक पटीने वाढवण्यात आलंय. सामान्यत: विमान भाडे प्रति प्रवासी सुमारे 25,000 ते 30,000 रुपये आहे, परंतु ते 1 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, अशी माहिती तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

Commonwealth Games 2026: किराणा दुकान चालवणाऱ्या बापाच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! बिंद्यारानी देवीने भारताला जिंकून दिले सहावे पदक

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

Latest Marathi News Update: आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT