Greece Train Accident 
ग्लोबल

Greece Train Accident: मोठी दुर्घटना, मालगाडीची प्रवासी रेल्वेला धडक; १६ जणांचा मृत्यू

ग्रीसमध्ये मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली

सकाळ डिजिटल टीम

ग्रीसमध्ये मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मालगाडीची प्रवासी रेल्वेला धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून ८५ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा प्रवासी रेल्वे आणि वस्तूंच्या ट्रेनमध्ये टक्कर झाली. हा अपघात खूप भयानक होता, ज्यामुळे बर्‍याच बोगी रुळावरून घसरल्या. तीन बोगींना आग लागली. प्रवासी रेल्वेमध्ये बसलेल्या मोठ्या संख्येने प्रवासी या अपघातात बळी पडले. आतापर्यंत 16 लोकांचे मृतदेह मिळाले आहेत.

मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर तर 85 हून अधिक जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 25 जणांची स्थिती गंभीर आहे. हा अपघात ग्रीक शहर थायन्सलोनिकी आणि लॅरिसा दरम्यान झाला.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा प्रवासी रेल्वे थेस्सालोनिकीच्या दिशेने जात असताना सलोनिकीहून लॅरिसाला जाणारी मालवाहू रेल्वे लॅरिसा शहराबाहेर धडकली.

माध्यमांशी बोलताना गव्हर्नर कॉन्स्टँटिनोस अगोरास्टोस म्हणाले की, 'धडक खूप जोरदार होती'. पॅसेंजर ट्रेनचे पहिल्या चार बोगी रुळावरून घसरल्या होत्या, तर पहिल्या दोन बोगी 'जवळपास पूर्णपणे नष्ट' झाल्या. अगोरास्टोस यांनी सांगितले की, सुमारे 250 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि त्यांना बसने थेस्सालोनिकीला पाठवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG supply India news : आनंदाची बातमी! गॅस टंचाई दूर होणार, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून २० हजार ४०० मेट्रिक टनाचे एलपीजी मुंबईकडे रवाना

Mumbai News: यूपी-बिहार आणि अन्य शहरातून येणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईत परवडणारी घरे मिळणार; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Viral Video : विराट कोहलीची 'कॉपी' करायला गेला, बाबर आझम स्वतःच्याच जीवाशी खेळला... थोडक्यात वाचला, सर्व खेळाडू पळत आले...

Chhagan Bhujbal helicopter landing : हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये का उतरावं लागलं छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं

Monali Jadhav : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मोनालीने पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न केले साकार

SCROLL FOR NEXT