Afganistan file photo
ग्लोबल

VIDEO: काबूल विमानतळावर गोळीबार, पाहा भयावह स्थिती

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानी दहशतवादी काबुलमध्ये घुसले.

दीनानाथ परब

काबूल: काबूल तालिबानच्या (kabul taliban) ताब्यात गेल्यानंतर परदेशी नागरिकांनी अफगाणिस्तान सोडण्यास सुरुवात केली आहे. विविध देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना (diplomatic personnel) अफगाणिस्तानातून (Afganistan) सुरक्षितरित्या (Evacuation) बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु असताना, काल काबूल विमानतळावर गोळीबाराची घटना घडली. स्पुटनिकने दिलेल्या वृत्तात या गोळीबारात किती जिवीतहानी झाली, त्याबद्दल कुठलीही स्पष्टता नाहीय.

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानी दहशतवादी काबुलमध्ये घुसले. त्यामुळे शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झालीय. तालिबान राजवटीचा अनुभव असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती, दहशत आहे. अफगाणिस्तानात कशी गोंधळाची स्थिता आहे, त्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर गर्दी उसळली आहे. शेकडो लोक विमानतळावर दाखल होत आहेत.

काबूल विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी आहे. मूळ अफगाणि नागरिकांनीही देशाबाहेर जाण्यासाठी गर्दी केलीय. रस्त्यावर तालिबानी दहशतवाद्यांना पाहून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झालीय, असे काबूल पीस फोरमच्या शरीफ साफी यांनी सांगितले. "आजचा दिवस वेगळा आहे. संपूर्ण शहर शांत आहे. प्रत्येकजण घाबरलेला आहे. आज दुपारी तालिबानने काबूलमध्ये प्रवेश केल्याचे आम्ही ऐकले" असे साफी यांनी अल जझीराशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT