Co2
Co2 
ग्लोबल

अब्जाधीशांच्या सवयी पर्यावरणाला घातक

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क - पर्यावरण बदलाबाबत जगभरात चिंता व्यक्त होत असताना आणि या बदलासाठी कार्बनचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन कारणीभूत असल्याचे सांगितले जात असताना, ‘ॲमेझॉन’चे जेफ बोझेस आणि ‘टेस्ला’चे एलॉन मस्क यांच्यासह जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या राहणीमानाच्या सवयींमुळे कार्बनचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होत असल्याचे दिसून आले आहे. सामान्य नागरिकांच्या तुलनेत या व्यक्तींकडून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कित्येक पटींनी अधिक असल्याचेही दिसते.   

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अब्जाधीशांकडे मोठी खासगी जहाजे, विमाने, आलिशान घरे, गाड्या आणि इतर अनेक सुखसुविधा असतात. या सर्वांमधून मोठ्या प्रमाणावर हरितवायूंचे उत्सर्जन होत असते. एका सुसज्ज खासगी जहाजातून वर्षभरात जवळपास ७ हजार टन कार्बन वातावरणात सोडला जातो. पाश्‍चिमात्य देशांमधील काही अब्जाधीशांच्या राहणीमानाचा आढावा घेतला असता, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होत असल्याचे दिसून आले आहे.

यासाठी त्यांची घरे, त्यांच्याकडील वाहतुकीची साधने, त्यांचा वापर याचा अभ्यास तज्ज्ञांच्या एका गटाने केला. जगभरातील सामान्य व्यक्ती एका वर्षात सरासरी ५ टन कार्बन उत्सर्जित करत असताना अब्जाधीशांकडून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनचे सरासरी प्रमाण ८ हजार टन इतके प्रचंड आहे. 

अब्जाधिशांशिवाय, श्रीमंत देशांमधील व्यक्तींच्या राहणीमानाच्या सवयींमुळेही वातावरणात अधिक कार्बन उत्सर्जित होत असल्याचे दिसून आले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT