Gajha Patti sakal
ग्लोबल

Hamas Attack : इस्राईलच्या गावात दहशतवाद्याचे क्रौर्य; रस्त्या-रस्त्यांवर मृतदेह विखुरलेले

गाझा पट्टीतील सीमेजवळील या गावावर हमासने केलेल्या हल्ल्यात येथील अनेक जणांचा मृत्यू झाला असून त्यानंतरच्या संघर्षात क्फार अझा हे गाव बेचिराख झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

क्फार अझा - गाझा पट्टीतील सीमेजवळील या गावावर हमासने केलेल्या हल्ल्यात येथील अनेक जणांचा मृत्यू झाला असून त्यानंतरच्या संघर्षात हे गाव बेचिराख झाले आहे. या गावातील रस्त्यारस्त्यांवर मृतदेह विखुरलेल्या स्थितीत पडलेले आढळत असल्याचे स्वयंसेवी संघटनांनी सांगितले. बाँबहल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे सांगाडे आणि जळून बेचिराख झालेल्या गाड्याही दिसत असल्याने हे संपूर्ण गावच मृत झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

हमासने गाझा पट्टीतून इस्राईलच्या हद्दीत घुसखोरी करताना अनेक गावांवर हल्ले केले. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत अनेक नागरिकांची हत्या केली. महिला, लहान मुले यांच्यासह अनेकांना घरात घुसून मारण्यात आले. दहशतवाद्यांच्या ताब्यातून हे गाव परत घेताना इस्राईलने दहशतवाद्यांना लक्ष्य करत रणगाड्यांमधून बाँबवर्षाव केला. तसेच, सैनिकांनीही दहशतवाद्यांना टिपून मारले.

बराच रक्तपात झाल्यानंतर या गावावर इस्राईलने पुन्हा नियंत्रण मिळविले आहे. यानंतर वैद्यकीय पथके आणि स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने येथे बचावकार्य सुरु असून मृतदेहांची विल्हेवाट लावली जात आहे. इस्राईल सरकारने पत्रकारांनाही या गावात नेत हमासने केलेले अत्याचार दाखविले.

सामूहिक हत्याकांड

‘लहान बालके आणि त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह अनेक घरांमध्ये दिसत आहेत. हमासने केलेले हे सामूहिक हत्याकांडच आहे,’ असे मेजर जनरल इटाय व्हेरुझ यांनी सांगितले. क्फार अझा हे गाव गाझा पट्टी आणि इस्राईल यांच्यातील सीमारेषेपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. गावाकडे येत असतानाच रस्त्यांवर मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत पडलेले आढळले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT