Hamas members beat civilians and steal the humanitarian aid they received from international organizations facilitated by Israel 
ग्लोबल

VIDEO: इस्राइलने व्हिडिओ शेअर करत हमास अतिरेक्यांची केली पोलखोल! सर्वसामान्यांचे अन्न..

इस्राइलच्या सुरक्षा दलाने दावा केलाय की, हमासचे अतिरेकी गाझातील सामान्य नागरिकांकडून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू हिसकावून घेत आहेत.

कार्तिक पुजारी

तेल अविव- इस्राइल आणि हमासमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयडीएफकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओचा आधार घेऊन इस्राइलच्या सुरक्षा दलाने दावा केलाय की, हमासचे अतिरेकी गाझातील सामान्य नागरिकांकडून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू हिसकावून घेत आहेत. (Hamas members beat civilians and steal the humanitarian aid they received from international organizations facilitated by Israel)

गाझातील नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय मदत देण्यात येत आहे. पण, ही मदत हमासचे अतिरेकी बळजबरीने लुटत आहेत, असं इस्राइलच्या लष्कराने म्हटलंय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बंदूकधारी अतिरेकी लोकांना मारत आहेत. त्यांना धमकावून त्यांच्याकडील अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू हिसकावत आहेत.

इस्राइलने ७ नोव्हेंबरपासून हमास विरोधात युद्ध पुकारले आहे. हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं. युद्धामध्ये आतापर्यंत १६ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय. सर्वाधिक मृत्यू गाझा पट्टीतील निष्पाप नागरिकांना झाला आहे. यात मोठ्या प्रमाणात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

गाझा पट्टीतील भीषण परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवरुन त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरु झाला आहे. सुरवातीच्या काळात इस्राइलने ही मदत मिळू नये असे प्रयत्न केले होते. पण, जागतिक देशांच्या दबावामुळे त्यांनी मदतीसाठी परवानगी दिली. आता इस्राइलने आरोप केलाय की मिळालेली आंतरराष्ट्रीय मदत हमासच्या अतिरेक्यांच्या हातात जात आहे.

इस्राइलच्या सुरक्षा दलाने दावा केलाय की, हमासचे दहशतवादी छुप्या पद्धतीने हल्ला करत आहेत. ते सर्वसामान्य लोकांना ढाल करत आहेत. तसेच शाळा, मश्चिद यामध्ये लपून हल्ला करत आहेत. दरम्यान, हमासने दावा केलाय की, इस्राइल सुरक्षा दल सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना मदत मिळण्यात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप केलाय.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT