Israel 
ग्लोबल

Israel: तुमची मुलगी स्वर्गात जाईल; आई-वडिलांसमोरच हमास दहशतवाद्यांनी घेतले तिचे प्राण, व्हिडिओ

कार्तिक पुजारी

जेरुसलम- इस्त्राइलमधील परिस्तिथी स्फोटक बनत चालली आहे. इस्त्राइलमधून हृदयाचे थरकाप उडवणारे व्हिडिओ आणि फोटो समोर येऊ लागले आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला असून यात हमासच्या दहशतवाद्यांची क्रूरता दिसून आली आहे. यात हमासच्या दहशतवाद्यांनी आई-वडिलांसमोर त्यांच्या मुलीचा जीव घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

इस्त्राइलमधील पत्रकार हनाया नेफ्ताली यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यात मुलीचा तिच्या आई-वडिलांसमोरच जीव घेण्यात आला. तसेच तुमची मुलगी स्वर्गात जाईल असं हमासचे दहशतवादी म्हणताना दिसत आहेत. कुटुंबीय जिवाच्या आकांताने ओरडतात, रडतात, याचना करतात पण दहशतवादी थोडीही दया दाखवत नाहीत.

पत्रकार नेफ्ताली व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, इस्त्राइली कुटुंबाला हमासच्या दहशतवाद्यांनी बंदी बनवले. त्यांच्या इस्त्राइलमधील घरावर ताबा मिळवला. कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यांकडे पाहा. हा मानवतेविरोधातील गुन्हा आहे. मी जगभरातील नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी याबाबत कार्यवाही करावी. (Hamas terrorist execute Israeli girl in front of family)

व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं आणि एक जोडपे दिसत आहे. सर्व कुटुंब रडत आहे. बॉम्ब हल्ल्याचा आवाज मागे येत आहे. सर्व कुटुंब भीतीने कापत आहे. दहशतवादी तेव्हा मुलीला मारुन टाकतो. तेव्हा लहान मुलगा रडायला लागतो. त्यावर एक दहशतवादी म्हणतो, रडू नकोस ती स्वर्गात गेली आहे. या व्हिडिओवरुन इस्त्राइलमधील परिस्थितीचे गंभीर स्वरुप दिसून येते.

दरम्यान, इस्त्राइलमध्ये घुसखोर हमास दहशतवादी धुमाकूळ घालत आहेत. अनेक महिलांचे अपहरण करण्यात आले आहे. माहितीनुसार १०० पेक्षा जास्त नागरिक आणि लष्करी सैनिकांचे हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. रॉकेट हल्ल्याचे सत्र सुरुच आहे. इमारती ढासळत आहेत.अनेक लोकांना बेघर व्हावे लागले आहे. येत्या काळात युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News:मुंबई मेट्रो-3: दिव्यांग प्रवाशांना करावा लागतोय त्रासाचा सामना

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT