Haqqani network chief Jalaluddin Haqqani passed away
Haqqani network chief Jalaluddin Haqqani passed away 
ग्लोबल

हक्कानी नेटवर्कचा सर्वेसर्वा जलालुद्दीन हक्कानीचे निधन

पीटीआय

काबूल : अफगाणिस्तानातील सक्रिय दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कचा सर्वेसर्वा जलालुद्दीन हक्कानी याचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याचे वय 79 असल्याचे सांगितले जात आहे. हक्कानीच्या मृत्यूबाबत अफगाणिस्तान तालिबान संघटनेने अधिकृत घोषणा केली. अफगाणिस्तानातील भारताच्या अनेक ठिकाणांवर हल्ले घडवून आणण्यात हक्कानी नेटवर्कला जबाबदार मानले गेले आहे.

2008 च्या काबूलमधील भारतीय दूतावासावरील हल्ल्यात 58 जण ठार झाले होते. जलालुद्दीन हक्कानीचा मृत्यू कोठे आणि कधी झाला, याबाबत माहिती दिलेली नाही. हक्कानीच्या मृत्यूबाबत अनेक वर्षांपासून अफवा पसरत होत्या. जलालुद्दीन हक्कानी हा कुशाग्र बुद्धीचा होता. 1980 च्या दशकात अफगाणिस्तानातील रशियन फौजाशी हक्कानीने मुकाबला केला होता. त्या वेळी मुजाहिदिनला अमेरिकेचा पाठिंबा होता. 1995 मध्ये हक्कानी नेटवर्कने तालिबानशी हातमिळवणी केली आणि दोन्ही गटाने राजधानी काबूलवर कब्जा मिळवला.

2012 मध्ये अमेरिकेने हक्कानी नेटवर्कला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकले. जलालुद्दीन हक्कानी याने पाकिस्तानच्या दारूल हक्कानिया मदरशातून शिक्षण घेतले होते. या मदरशाचे तालिबानशी घनिष्ठ नाते होते. अरबी भाषेवर प्रभुत्व राखणाऱ्या हक्कानीचे अल कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेनशीदेखील संबंध होते. 2001 मध्ये अफगाणिस्तानातील अमेरिकी सैनिक मोहिमेनंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर सक्रिय झालेल्या दहशतवादी संघटनेत हक्कानी नेटवर्क आघाडीवर होते. ही संघटना पाकिस्तानात सीमेलगत काम करत होती.

काबूलमध्ये 2017 मध्ये स्फोटकाने भरलेल्या ट्रकचा स्फोट घडवून आणला तेव्हा दीडशे नागरिक ठार झाले होते. हा हल्ला हक्कानी नेटवर्कने घडवून आणल्याचे सांगितले जाते. हक्कानीच्या मृत्यूमुळे अफगाणिस्तानात काही प्रमाणात शांतता प्रस्थापित होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. जलालुद्दीन आजारी असला तरी तो आपल्या अनुभवाचा आणि डोक्‍याचा वापर करत असल्याने नेटवर्कला मदत मिळत होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT