Hawaii Wildfire 
ग्लोबल

Hawaii Wildfire: हवाईच्या जंगलात अग्नितांडव! मृतांची संख्या ६७ वर, शोध मोहीम सुरु...

Sandip Kapde

Hawaii Wildfire: अमेरिकेतील हवाई येथील माउईच्या जंगलात भीषण आग लागली आहे. आग किती वेगवान आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, लहैना शहरात आतापर्यंत किमान ६७ जणांनी लोकांना बाहेर काढताना आगीत अडकून आपला जीव गमावला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सातत्याने प्रयत्न करत आहेत.

हवाई येथे असलेल्या लहेना, पुलेहू आणि अपकंट्रीमध्ये नवीन आग लागली आहे. लोकांची जीव वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे. काही लोकांनी समुद्रात उडी मारली आहे. इतकंच नाही तर बेटावरील ऐतिहासिक शहरांचा मोठा भाग आगीमुळे नष्ट झाला आहे. जंगलातील आगीमुळे लाहैना शहरातील पर्यटन स्थळांचे मोठे नुकसान झाले आहे.

अमेरिकेच्या हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ डोरा देखील हवाईमधील या जंगलातील आगीच्या जलद उद्रेकास कारणीभूत आहे, ज्याच्या जोरदार वाऱ्यामुळे आग खूप वेगाने पसरली होती.

अग्निशामक दल लोकांची सुटका करत आहेत आणि आग आटोक्यात आणत आहेत. लहेना येथे लागलेली आग इतकी भीषण आहे की लोकांना वाचवणे कठीण झाले आहे.आणखी १४ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ६७ वर पोहोचला आहे. (Latest marathi news)

सध्याची परिस्थिती कशी आहे?

अग्निशमन दलाच्या जवानांना मोठा त्रास होत आहे. बुधवारी स्थानिक वेळेनुसार, माउई बेटावरून 14 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ज्या लोकांना वाचवण्यात आले आहे त्यांना हवाईमधील इतर ठिकाणी पाठवण्यात आले आहे.

भारतातून पाठवलेला एक 150 वर्षांचा वटवृक्ष आणि अमेरिकेतील सर्वात मोठा वटवृक्ष आज आपल्या अस्तित्वासाठी लढा देत आहे. प्राणघातक वणव्याची आग माउईच्या हवाई बेटावर पसरली आहे. आगीमुळे अनेक इमारती बाधित झाल्या असून 67 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 46 देठ असलेल्या या वटवृक्षाला हवाईमध्ये पानियाना म्हणतात. 1873 मध्ये माउईवरील लहेना शहरात जेव्हा ते लावले गेले तेव्हा ते फक्त आठ फुटांचे रोपटे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

सुपरस्टार अभिनेता Vijay Deverakonda च्या कारचा भीषण अपघात! नेमकं काय घडलं? पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Georai Nagarparishad Election : बीडमधील गेवराईचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; गीता पवार, शितल दाभाडे दावेदार

Raju Shetty : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारी मान्य केली; मग कारवाई का नाही

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT