Top 10 worse cities in the world to live esakal
ग्लोबल

यावर्षी जगातील 'ही' टॉप १० शहरं ठरली राहण्यास अयोग्य; EIUची यादी जाहीर

जगातील एकूण १७२ शहरांचा EIU कडून अभ्यास करण्यात आलाय.

सकाळ डिजिटल टीम

यंदा 'इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट' (EIU) ने २०२२ मधील जगातील टॉप १० सर्वोत्कृष्ट आणि १० सर्वात वाईट ठिकाणांचं ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स रँकिंग जाहीर केलंय. यात एकूण १७२ देशांचा समावेश आहे. यामध्ये संस्कृती, आरोग्य सेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा, आणि मनोरंजन या श्रेणींवर आधारित जगातील चांगल्या आणि सर्वात वाईट शहरांची यादी जाहीर करण्यात आलीय. जाणून घेऊया या लीस्टमध्ये जगातील नेमक्या कोणत्या शहरांची नावं आहेत.

जगातील एकूण १७२ शहरांचा EIU कडून अभ्यास करण्यात आलाय. EIU म्हणजेच इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट कडून दरवर्षी संस्कृती, आरोग्य सेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा , आणि मनोरंजन या श्रेणींचा आधार घेत जगातील राहाण्यास योग्य आणि राहाण्यास अयोग्य अशी यादी जाहिर करण्यात येते. यामध्ये भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमधील कराची हे शहर सलग तिसऱ्यांना EIU च्या जाहीर लीस्टमध्ये राहाण्यास अयोग्य ठरलंय. बांग्लादेशमधील ढाका या शहराचा देखील यात समावेश आहे.

जगातील ही दहा शहरं ठरली राहाण्यास अयोग्य (सर्वाधिक वाईट)

देश आणि देशातील शहरं

इराण (Iran) - तेहरान (Tehran)

डौला (Douala) - कॅमेरून (Cameroon)

झिंबाब्वे (Zimbabwe) - हरारे (Harare)

बांग्लादेश (Bangladesh) - ढाका (Dhaka)

पीएनजी (PNG) - पोर्ट मोरेस्बी (Port Moresby)

पाकिस्तान (Pakistan) - कराची (Karachi)

अल्गेरिया (Algeria) - अल्गीयर्स (Algiers)

लीब्या (Libya) - त्रीपोली (Tripoli)

नायगेरिया (Nigeria) - लागोस (Lagos)

सिरिया (Syria) - दमास्कस (Damascus)

सर्वात वाईट यादीतील शहरांमध्ये काही गंभीर सामाजिक समस्या आणि सुरक्षेचा प्रश्न समान दिसतो. उदाहरणार्थ, निर्देशांकाने असे म्हटले आहे की, सूचीतील दमास्कसचे स्थान कदाचित सीरियन शहरावर परिणाम करणाऱ्या सामाजिक अशांतता, दहशतवाद आणि संघर्षाचा परिणाम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Changes : रामनवमीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी वाहतुकीत बदल

भारत पाकिस्तानसारखा 'दलाल देश' नाही; सर्वपक्षीय बैठकीत इराण युद्धात मध्यस्थीच्या मुद्द्यावर जयशंकर यांचं उत्तर

Solapur News : विखे-पाटलांचे कडक आदेश: अधिकाऱ्यांची पळापळ, माढ्यात पाणीच पाणी!

Customs Duty: कस्टम ड्यूटी पेमेंटमध्ये मोठा बदल! UPI द्वारे पेमेंटला मंजुरी; CBIC चा मोठा निर्णय, नेमकी प्रक्रिया काय?

वकिलाचे न्यायमूर्ती झालो, आता निवृत्तीला आलो तरी रुग्णालय नाही; मेळघाटातल्या कुपोषणावरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं

SCROLL FOR NEXT