Blast sakal
ग्लोबल

उलटलेल्या टँकरमधलं तेल लुटायला गेले आणि ६० जणांनी गमावला जीव

कॅरेबियन देश हैतीमधील कॅप हैतीयन या शहरात मंगळवारी तेलाचा टॅंकर उलटून अपघात झाला.

दत्ता लवांडे

हैती : कॅरेबियन देश हैतीमधील कॅप हैतीयन या शहरात मंगळवारी तेलाचा टॅंकर उलटून अपघात झाला. टॅंकरमधील तेल लूटण्यासाठी लोकांची गर्दी जमा झाली पण अचानक या टॅंकरचा स्फोट होऊन या दुर्घटनेत जवळपास ६० लोकांचा मृत्यू झाल्याची माहीती न्युयार्क टाईम्स वृत्तसंस्थेने दिली आहे.

कॅप हैतीयन च्या महापौराने सांगितले की ''मी ५० लोकांचे मृतदेह जळताना पाहिले आहेत. त्या लोकांची ओळख पटवणे अवघड आहे.'' त्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्याने वेगाने जात असलेला टॅंकर उलटला आणि यातील तेल गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आणि त्यादरम्यान टॅंकरचा स्फोट झाला. तसेच हैतीचे पंतप्रधान एरिल हैंरी म्हणाले की ६० लोकं मृत्यू पावल्याचे दु:ख आहे. या घटनेमुळे त्यांनी देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित केला आहे.

आगीत २० पेक्षा जास्त घरे जळाली

तेल लूटीच्या दरम्यान लागलेल्या आगीत जवळपास २० पेक्षा अधिक घरे जळाली आहेत, घरातील लोकांचासुद्धा होरपळून मृत्यू झाला आहे. हैतीमध्ये तेलमाफीया सक्रीय असून लाईटच्या कमतरतेमुळे राजधानीतसुद्धा काही तासंच लाईट राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींनी केलेल्या अचानक घोषणे बद्दल काय आहे शरद पवारांचे मत? केली मोठी भविष्यवाणी

Raj Thackeray criticism narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले 'भुर्दंड जनतेला का ?'

Korean Peninsula Tensions: किम जोंग यांची हत्या झाल्यास अण्वस्त्र हल्ला; उत्तर कोरियाने स्वीकारले नवे धोरण

IPL 2026 : दिल्लीने पंजाबला हरवलं, पण कर्णधार अक्षर पटेलला BCCI ने सुनावली शिक्षा; नेमकी काय झाली चूक?

Maharashtra Cost Cutting Rules : महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT