Theft  Sakal
ग्लोबल

Hi-tech Theft : उबर घेऊन आला अन् कुबेर बनून गेला; चोरीच्या स्टाईलची सर्वदूर चर्चा

ड्रायव्हर त्याच्याजवळ पोहोचल्यावर त्याने त्याच्या डोक्याला बंदूक लावून कार ताब्यात घेतली.

सकाळ डिजिटल टीम

Uber Car For Theft : जगात प्रत्येक गोष्टीवर नवनवे प्रयोग होत असतात. अंतराळात पोहोचण्याचा विषय असो किंवा समुद्राच्या तळाशी जाऊन काहीतरी नवीन शोधण्याचा विषय असो सगळीकडे संशोधन आणि प्रयोग सुरू आहेत. म्हणजे नवा प्रयोग कुठं होत नाही? तर सगळीकडे लोक भन्नाट क्लुप्त्या वापरत असतात.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

असाच एक एक्सपिरिमेन्ट चोरी, लूट करणारे लोकही करत असतात असं सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण अहो मंडळी हे अगदी खरंय. आजकाल सर्वसामान्यांप्रमाणेच चोरांनीही आपल्या कामावर जाण्यासाठी आणि परतण्यासाठी कॅबचा वापर करायला सुरुवात केलीय.

आता ते कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे झाले असे की, एका 22 वर्षीय चोरट्याने बँक लुटण्यासाठी बाईक न वापरता चक्क उबर कॅब बुक केली आणि शांतपणे निघून गेला. कॅब बुक करून तिथून पळून जाण्याचा प्लॅन त्याने आखला आणि त्यात तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला. ही घटना घडलीय अमेरिकेच्या फ्लोरिडा या शहरात.

उबरच्या माध्यमातून चोरी

या 22 वर्षीय चोरट्याचं नाव आहे जेवियर राफेल. त्याला फ्लोरिडा शहरातून अटक करण्यात आलीय. जेवियर नावाच्या चोरावर डेस मोइनेस बँक लुटल्यानंतर उबर कॅब बुक केल्याचा आरोप आहे. ड्रायव्हर त्याच्याजवळ पोहोचल्यावर त्याने त्याच्या डोक्याला बंदूक लावून कार ताब्यात घेतली आणि दरोडा टाकून तेथून पळ काढला. तो यूएस-कॅनडा सीमेपासून थोड्याच अंतरावर असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडलं.

ड्रायव्हरने दिली चोरीची माहिती

डेस मोइनेस पोलीस विभागाचे प्रमुख पॉल परिजेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने दरोडा पडल्याची माहिती सर्वप्रथम कळवली होती. नंतर उबर कॅब ड्रायव्हरनेही गाडी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. संशयिताची ओळख पटल्यानंतर, पोलिसांनी चोराचा शोध सुरू केला आणि यूएस-कॅनडा सीमा ओलांडण्यापूर्वी त्याच कॅबमध्ये हा दरोडेखोर सापडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT