Avalanche 
ग्लोबल

पर्यटक थोडक्यात बचावले; पाहा धडकी भरवणारा हिमस्खलनाचा Video

काळजात धडकी भरवणारा हा व्हिडीओ किर्गिझस्तान देशातील तियान शान पर्वतरांगेतील आहे.

सकाळ डिजिटल टीम

बिश्केक (किर्गिझस्तान) : मध्य आशियातील किर्गिझस्तान देशात हिमस्खलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तियान शान पर्वतरांगेतील असल्याचं समोर आलं असून काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ हॅरी शिमिन यांनी शूट केल्याची माहिती मिळत आहे. तियान शान पर्वतरांगेवर काही लोक ट्रेकिंगसाठी आले असताना हा प्रकार घडला आणि त्याचवेळी हा क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे.

(Avalanche Viral Video)

मिळालेल्या माहितीनुसार, कझाकस्तानमधील तियान शान पर्वतरांगेत ट्रेकिंगसाठी 9 ब्रिटीश आणि 1 अमेरिकन पर्यटक गेले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झाले. या हिमस्खलनाचा व्हिडिओ हॅरी शिमिन या पर्यटकाने धाडसाने शूट केला. हॅरी शिमिन हे आपल्या ग्रुपपासून दूर काही फोटो काढण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्यासोबत हा प्रसंग घडला आहे. सुदैवाने ट्रेकिंगला गेलेला संपूर्ण गट या घटनेतून बचावला आहे. पण या घटनेत एका महिला ट्रेकरच्या गुडघ्याला जखम झाली असून घोड्यावरून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

"मी फोटो काढण्यासाठी ट्रेकिंग ग्रुप पासून काही अंतरावर गेलो होतो तेव्हा मला मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होताना दिसलं आणि मी ते कॅमेऱ्यात टिपलं. पण त्या ठिकाणाहून काही मिनीटांपूर्वी गेलो होतो. दर आम्हाला थोडाजरी उशीर झाला असता तर आम्ही सगळे आज जिवंत राहिलो नसतो." असं व्हिडीओ शूट केलेले हॅरी शिमिन यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh : कामगार, शेतकरी संघटनांकडून उद्या भारत बंद ; बँक, शाळा, महाविद्यालये अन् बाजारपेठा सुरू राहणार का?

T20 World Cup Super 8s Scenario : अफगाणिस्तानने थरारक लढतीत आफ्रिकेचा घाम काढला, पण सामना गमावला; आता सुपर ८ मध्ये कसे पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

Malvan ZP : ठाकरे शिवसेनेवर आत्मपरीक्षणाची वेळ; मालवण तालुका हातून निसटला, युतीने मिळविली निर्विवाद सत्ता

लिव्हर ट्रान्सप्लांट टाळायचंय? आयुर्वेदात आहे यकृत रक्षणाची ताकद, केवळ मद्यपानच नाही 'या' चुका ठरतात कारणीभूत

Life Numerology : 'या' महिन्यात जन्मलेले लोक असतात दीर्घायुषी; किती शारीरिक त्रास होऊदे, तरीही जास्त वर्षे जगतातच

SCROLL FOR NEXT