Hindi in America eSakal
ग्लोबल

Hindi in America : अमेरिकेतील शाळांमध्ये शिकवली जाणार हिंदी भाषा; १०० हून अधिक लोकप्रतिनिधींचा बायडेन यांना प्रस्ताव

अमेरिकेतील सुमारे १००० शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याबाबत हा प्रस्ताव आहे.

Sudesh

अमेरिकेतील शाळांमध्ये आता लवकरच हिंदी भाषा शिकवली जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील सत्ताधारी पक्षाची संघटना असलेल्या एशिया सोसायटी (AS), आणि इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट (IAI) या संघटनेतील सुमारे १०० हून अधिक लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना देण्यात आला आहे. (Hindi in America)

१००० शाळांमध्ये सुरूवात

अमेरिकेतील सुमारे १००० शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याबाबत हा प्रस्ताव आहे. यासाठी सुमारे ८१६ कोटी रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख करण्यात आला आहे. बायडेन यांचा भारताप्रति असणारा सकारात्मक दृष्टीकोन, आणि अमेरिकेत पुढील वर्षी होणारी अध्यक्षीय निवडणूक लक्षात घेता हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता दाट आहे. (America Schools Hindi)

पुढील वर्षी होऊ शकते सुरूवात

प्रस्ताव मंजूर झाला, तर पुढील वर्षी सप्टेंबरपासून अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्यास सुरूवात होऊ शकते. यासाठी शिक्षकांची व्यवस्था करणे आणि अभ्यासक्रम तयार करणे अशा कामांमध्ये मदत करण्याचे आश्वासन एएस आणि आयएआय या दोन्ही संघटनांनी दिलं आहे.

स्पॅनिशची जागा घेणार हिंदी

अमेरिकेत इंग्रजीनंतर दुसरी भाषा म्हणून मोठ्या प्रमाणात स्पॅनिश शिकवलं जातं. मात्र, हा प्रस्ताव मंजूर झाला तर याठिकाणी हिंदीचा पर्यायही उपलब्ध होईल. अमेरिकेत माध्यमिक शाळांमध्ये कित्येक ठिकाणी हिंदीचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, आता प्राथमिक वर्गांपासूनच हिंदीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

चार राज्यांमध्ये १० शाळा

सध्या अमेरिकेच्या न्यू जर्सी, टेक्सस, न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया या राज्यांमध्ये हिंदी शिकवणाऱ्या सुमारे १० शाळा आहेत. या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT