girls
girls  
ग्लोबल

भारत-पाकिस्तानमधील 'त्या' दोघींची अनोखी लव्ह स्टोरी

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : जागतिक फ्रेंडशिप डे सगळीकडे साजरा होत असताना अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारत आणि पाकिस्तानी वंशाच्या असलेल्या त्या समलिंगी दोघींच्या लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर चर्चा आहे.

आपल्यासारख्याच दिसणार्‍या, आपल्याच वयाच्या किंवा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचं आकर्षण होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. समलिंगी असणं नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक अग्रक्रम असतात. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटते. म्हणजेच तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटते, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावेसे वाटते. अशीच एक समलैगिक जोडप्याची लव्हस्टोरी व्हायरल होत असून सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. एका छायाचित्रकाराने आपल्या आपल्या हँडलवरून ‘अ न्यूयॉर्क लव्ह स्टोरी’ या कॅप्शनखाली या दोघींचे काही फोटोज शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये दिसणारी एक मुलगी अंजली चक्रा ही भारतीय वंशाची आहे. तर दुसरी सुंदास मलिक ही पाकिस्तानी वंशाची आहे. या दोघीही गेले वर्षभर रिलेशनशिपमध्ये असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यांनी काही फोटोस शेअर करून आपल्या रिलेशनशिपबद्दल सांगितले आहे. सुंदास मलिक एक आर्टिस्ट आहे. त्यांच्या रिलेशनशिपला एक वर्ष झाल्यानंतर त्यांनी आपले काही फोटोस इन्स्टाग्रामवर शेअर केले. तसेच आपल्या रिलेशनशिपला एक वर्ष झाल्याचे त्यांनी सेलिब्रेशनही केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT