BAPS Swaminarayan temple in the USA vandalized just days before Janmashtami celebrations, raising concerns over religious safety.  esakal
ग्लोबल

Hindu Temple Attacked in USA: अमेरिकेत पुन्हा हिंदू मंदिरावर हल्ला; जन्माष्टमीपूर्वी स्वामीनारायण मंदिराला केले गेले लक्ष्य!

BAPS Swaminarayan temple attack in USA before Janmashtami: एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मंदिरावर हल्ला होण्याची ही चौथी वेळ आहे.

Mayur Ratnaparkhe

Hindu Temple Targeted in USA Before Janmashtami: अमेरिकेत हिंदू मंदिरांना सतत लक्ष्य केले जात आहे. आता देखील इंडियानामध्ये एका हिंदू मंदिराचे नुकसान करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना १० ऑगस्ट रोजी ग्रीनवुड शहरातील BAPS स्वामीनारायण मंदिरात घडली. 

यानंतर शिकागोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेची गंभीर दखल घेतली आणि हे निंदनीय असल्याचे म्हटलं. तर एका निवेदनात, वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की मंदिराच्या मुख्य साइनबोर्डची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात उपद्रवींकडून घडणाऱ्या गैरकृत्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

X पोस्टमध्ये म्हटले आहे की, "इंडियानाच्या ग्रीनवुडमधील BAPS स्वामीनारायण मंदिराच्या मुख्य साइनबोर्डची विटंबना निंदनीय आहे." तसेच त्यांनी त्वरित कारवाईसाठी कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे, असे म्हटले आहे. मंदिर संकुलाच्या भिंतींवर भारतविरोधी आणि हिंदूविरोधी घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या.

एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मंदिरावर हल्ला होण्याची ही चौथी वेळ आहे. ही घटना कृष्ण जन्माष्टमीच्या काही दिवस आधी घडली आहे. तर मार्चमध्ये, अमेरिकेत अशाच प्रकारच्या आणखी एका घटनेत, कॅलिफोर्नियातील बीएपीएस हिंदू मंदिराची अज्ञात व्यक्तीने विटंबना केली होती. त्यावेळी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे कृत्य घृणास्पद असल्याचे म्हटले होते आणि अमेरिकन कायदा अंमलबजावणी संस्थांना जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Decision on Savings Schemes : PPF, KVP, SSY सह अनेक बचत योजनांच्या व्याज दरांबाबत सरकारने घेतला निर्णय!

एकुलती एक लेक अन् दुसरं लग्न... नवऱ्याच्या आजारपणाबद्दल सांगितल्यावर काय म्हणालेले अभिज्ञाचे आई-वडील?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली दुर्गामातेची आरती

Accenture Lays Off : 'IT'क्षेत्राला 'AI'चा फटका! , ‘Accenture’ ने 11 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Mumbai Local: लोकल प्रवाशांना होणार फायदा! ७ नवे रेल्वे स्टेशन उभारणार, कुठे आणि कोणते? पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT