White House esakal
ग्लोबल

White House America : जगभरात कुतुहलाचा विषय ठरलेलं अमेरिकेचं व्हाईट हाऊस आतून कसं आहे? जाणून घ्या...

या व्हाईट हाऊसचा इतिहास सर्वात रंजक आहे.

वैष्णवी कारंजकर

व्हाईट हाऊस जगभरात कुतुहलाचा आणि कौतुकाचा विषय ठरत असतो. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती आणि त्यांचा परिवार राहतो. हे अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष कार्यालय आहे. व्हाईट हाऊसला जगातली सर्वात महत्त्वाची आणि सुरक्षित इमारत मानली जाते.  या इमारतीचा इतिहास आणि त्याबद्दल काही  महत्त्वाच्या गोष्टी.

व्हाईट हाऊसच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊस आज जिथे आहे ती जागा १७९१ मध्ये अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी निवडली होती. पुढच्याच वर्षी, म्हणजे 1792 मध्ये, इमारतीची पायाभरणी करण्यात आली आणि बांधकामासाठी आयरिश वंशाचे वास्तुविशारद जेम्स होबान यांची रचना निवडण्यात आली. आठ वर्षांच्या बांधकामानंतर, बांधकाम चालू असतानाच अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष जॉन अॅडम्स आणि त्यांची पत्नी अबीगेल व्हाईट हाऊसमध्ये राहू लागले.

https://www.whitehouse.gov/ नुसार, १८१२ च्या युद्धात व्हाईट हाऊस ब्रिटीशांनी जाळून टाकलं होतं आणि जेम्स होबान यांना पुन्हा ते बांधण्यासाठी नियुक्त करण्यात आलं. यानंतर, १८१७ मध्ये, अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष जेम्स मनरो व्हाईट हाऊसमध्ये राहू लागले आणि त्यांच्या कार्यकाळातच साउथ पोर्टिको बांधलं गेलं.

सन १८२९ मध्ये सातवे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांच्या देखरेखीखाली नॉर्थ पोर्टिको या इमारतीत बांधण्यात आले. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व्हाईट हाऊसचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन अध्यक्षीय निवासस्थान बांधण्यासाठी अनेक प्रस्ताव देण्यात आले होते, परंतु त्यांची अंमलबजावणी कधीच झाली नाही.

१९०२ मध्ये, अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, थिओडोर रूझवेल्ट यांनी व्हाईट हाऊसच्या दुरुस्तीची सुरुवात केली,. त्यांनी अध्यक्षीय कार्यालय निवासस्थानाच्या दुसऱ्या मजल्यावरून नव्याने बांधलेल्या तात्पुरत्या कार्यकारी कार्यालयाच्या इमारतीत हलवलं. ही तात्पुरती कार्यकारी कार्यालयाची इमारत आता वेस्ट विंग म्हणून ओळखली जाते.

थिओडोर रुझवेल्टच्या काळात केलेले बांधकाम आणि बदलाचे काम न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी मॅककिम, मीड अँड व्हाईट यांनी डिझाइन आणि अंमलात आणलं होतं. रुझवेल्ट नंतर २७ वे राष्ट्राध्यक्ष बनलेले विल्यम हॉवर्ड टाफ्ट यांनी ऑफिस विंगमध्ये ओव्हल ऑफिस बांधलं होतं.

 अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर 'टेडी' रुझवेल्ट यांनी नूतनीकरण सुरू केल्यानंतर ५० वर्षांहून कमी कालावधीनंतर, व्हाईट हाऊसची संरचना झाली. यावर अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रुमन यांनी पुन्हा इमारतीचं नूतनीकरण सुरू केलं, बाहेरील भिंतीशिवाय सर्व काही पाडलं आणि यावेळी पुनर्बांधणीचे काम वास्तुविशारद लोरेन्झो विन्स्लो यांच्याकडे होतं आणि १९५२ मध्ये ट्रुमन कुटुंब व्हाईट हाऊसमध्ये परतले.

व्हाईट हाऊसची वैशिष्ट्ये:

१.    अमेरिकेचे दुसरे राष्ट्रपती जॉन एडम्स एस या इमारतीचे पहिले रहिवासी होते.

२.    व्हाईट हाऊसला प्रेसिडेंट्स पॅलेस, प्रेसिडेंट्स हाऊस, एक्सिक्युटिव्ह मॅन्शन अशा नावांनी इतिहासात ओळखलं गेलं आहे.

३.    अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट यांनी १९०१ मध्ये व्हाईट हाऊसला अधिकृतपणे व्हाईट हाऊस हे नाव दिलं.

४.    व्हाईट हाऊस म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनामध्ये १३२ खोल्या आहेत आणि सहा मजले आहेत.

५.    व्हाईट हाऊसमध्ये एकूण ४१२ दरवाजे, १४७ खिडक्या, आठ जिने आणि तीन लिफ्ट्स आहेत.

६.    व्हाईट हाऊसच्या किचनमध्ये १४० पाहुण्यासाठी जेवण तयार कऱण्याची क्षमता आहे.

७.    व्हाईट हाऊसच्या केवळ चार भिंतींना रंग देण्यासाठी जवळपास २१५८ लीटर रंगाची गरज पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT