Hollywood Actor Tom Cruise esakal
ग्लोबल

अमेरिकेतून ब्रिटनमध्ये मागवले 300 केक; टॉम क्रूजनं पाठवलं प्रायव्हेट जेट

सकाळ डिजिटल टीम

टॉम क्रूजनं आपल्या टीमला पार्टी देण्यासाठी थेट अमेरिकेतून 300 खास केक मागवले आहेत.

ब्रिटन : हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजनं (Hollywood Actor Tom Cruise) 'मिशन इम्पॉसिबल'च्या टीमला (Mission Impossible Team) ख्रिसमस पार्टी देण्यासाठी थेट अमेरिकेतून 300 खास ख्रिसमस केक (Christmas Cake) मागवले आहेत. यासाठी त्यानं आपल्या खासगी जेटची (Jet) मदत घेतलीय. 'द सन'च्या वृत्तानुसार, केक घेण्यासाठी हजारो रुपये देण्यापूर्वी या 59 वर्षीय फिल्म स्टारनं 5500 मैल (जवळपास 8,000 किलोमीटर) पेक्षा जास्त प्रवास केला होता.

एका सूत्रानं सांगितलं, की टॉमला आपल्या टीमसाठी पार्टी द्यायची होती. म्हणून, त्यानं केक अमेरिकेतून आणण्याचा निर्णय घेतला. तेही स्वत:च्या जेटमधून.. अमेरिकेतील लॉस एंजेलिस (Los Angeles America) या त्याच्या आवडत्या बेकरीतून त्यानं 300 केकसाठी ऑर्डर दिलीय. या केकची किंमत साधारण £450 दशलक्ष असल्याचं मानलं जातंय.

टॉमच्या एका सहकार्यानं सांगितलं की, हे विलक्षण आहे; पण टॉम कमालीचा उदारही आहे. त्याच्यासोबत चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी त्याला काहीतरी खास करायचं असतं, त्यासाठी टॉमचा प्रयत्न असतो. कोरोनामुळं 'मिशन इम्पॉसिबल'च्या पुढील चित्रपट निर्मितीवर परिणाम झालाय. एथन हंटची गुप्तहेर भूमिका करणाऱ्या क्रूजनं 18 महिन्यांहून अधिक काळ अॅक्शन फिल्मवर काम केल्यानंतर, सप्टेंबरमध्ये चित्रीकरण पूर्ण केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT