घरातली कामं करा, ठणठणीत राहा; अभ्यासातील निष्कर्ष sakal media
ग्लोबल

घरातली कामं करा, ठणठणीत राहा; अभ्यासातील निष्कर्ष

शारीरिक क्षमता टिकून राहण्यास मदत

सकाळ वृत्तसेवा

लंडन : बसून राहण्यापेक्षा आपल्याच घरात छोटी-मोठी कामे करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल ‘बीएमजे ओपन’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची स्वत:ची दैनंदिन कामे आणि इतर घरातील छोटी कामे केल्याने त्यांची स्मृती टवटवीत राहते, प्रतिसाद क्षमता चांगली राहते, तसेच पायांमधील बळही टिकून राहण्यास मदत होते, असे या अहवालात म्हटले आहे. ‘ॲक्टिव्ह’ राहणाऱ्या ज्येष्ठांना चालताना किंवा जिना चढताना-उतरताना पडण्याची भीती वाटत नाही, असेही दिसून आले आहे. नियमित शारीरिक काम केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उतारवयाकडे झुकत असतानाही हात-पाय कामात गुंतवून ठेवल्यास आरोग्याचे अनेक धोके टळतात, असे दिसून आले आहे.

२०१६ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, श्रीमंत देशांमधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये घरात काम न करण्याची प्रवृत्ती अधिक प्रमाणात असते. त्यामुळे त्यांच्यात वयानुसार येणाऱ्या आजारांचे प्रमाणही अधिक असते. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मात्र ज्येष्ठ नागरिक अधिक प्रमाणात कामे करतात, त्यामुळे त्यांची प्रकृती टिकून राहते.

असे केले सर्वेक्षण

संशोधकांनी सिंगापूरमधील २१ ते ९० या वयोगटातील निवडक व्यक्तींच्या दिनचर्येचा अभ्यास केला. त्यांची २१ ते ६४ (तरुण) आणि ६५ ते ९० (वृद्ध) अशा वयोगटांमध्ये विभागणी करण्यात आली. शारीरिक क्षमता तपासण्यासाठी त्यांचा चालण्याचा वेग, जागेवर बसून पुन्हा उठण्याचा वेग मोजण्यात आला. तसेच स्मृती तपासण्यासाठी त्यांची बोलण्याची पद्धत, समोर घडणाऱ्या गोष्टींचे आकलन करण्याची क्षमता, त्यांना प्रतिसाद देण्याची क्षमता यांची नोंद घेण्यात आली. हे लोक किती प्रमाणात घरकाम करतात, किती नियमितपणे करतात याबाबतही माहिती घेण्यात आली. घरात फरशी पुसणे, धूळ साफ करणे, भांडी विसळून ठेवणे, इस्री करणे, स्वयंपाक करणे अशी कामे करणाऱ्यांच्या क्षमता टिकून राहिल्याचे किंवा असे काम न करणाऱ्यांच्या तुलनेत चांगल्या असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT