sinzo abe.jpg 
ग्लोबल

शिंजो आबे यांचा कार्यकाळ कसा होता आणि त्यांच्यानंतर जपानची धुरा कोणाकडे?

सकाळन्यूजनेटवर्क

टोकीओ- जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंजो आबे हे आजारी असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यामुळेच शिंजो अॅबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या 65 वर्षांचे असलेल्या शिंजो आबे यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 2021 पर्यंत होता.

ॲबे यांच्यानंतर कोण? 

ज्येष्ठ असलेले अर्थमंत्री तारो असो, साठीचे माजी संरक्षणमंत्री शिगेरू इशिबा, परराष्ट्रमंत्री राहिलेले फुमिओ किशीदा, विद्यमान संरक्षण मंत्री तारो कोनो, अबेंचे विश्वासू योशिहिदा सुगा यांची नावे पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहेत.

शिंजो ॲबे यांनी याच महिन्यात पंतप्रधानपदाचा सात वर्षे सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण करुन विक्रम केला. ते दोन हजार ८०३ दिवस या पदावर होते. यापूर्वी हा विक्रम त्यांचे काका व जपानचे माजी पंतप्रधान इसाकु सैतो यांच्या नावावर होता. ॲबे हे लिबरल डेमोक्रेटिक पार्टी (एलडीपी)चे सदस्य आहेत. ते जपानचे सर्वांत तरुण पंतप्रधान आहेत. २००६ मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारली होती. ॲबे यांचा पंतप्रधानपदाचा कालावधी मुदत सप्टेंबर २०२१ मध्ये संपणार होता. संसदेकडून नव्या पक्षनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईपर्यंत ते या पदावर राहणार होते.

शिंझो अॅबे हे जपानमधील प्रभावी राजकीय घराण्यातील. त्यांचे आजोबा किशी नोबुसुके (१९५७-६०) आणि चुलत आजोबा सातो इसाकु (१९६४-१९७२) जपानचे पंतप्रधान होते. टोकियोतील सैकेई विद्यापीठातून पदवीधर झाल्यावर अॅबे यांनी अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास केला. नंतर जपानला परतल्यावर लिबरल डेमोक्रॅटिक पक्षात (एलडीपी) सामील झाले. १९८२ पासून ते वडील आणि जपानचे परराष्ट्रमंत्री शिंतारो ॲबे यांचे सहायक झाले. शिंझो ॲबे १९९३ मध्ये जपानी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य झाले. पक्षाचे नेते कोझुमी जुनीशिरो यांना २००६ मध्ये पक्षनेतेपद आणि पंतप्रधानकी सोडावी लागली आणि ॲबे त्यांच्या जागी विराजमान झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेले ॲबे जपानचे पहिले पंतप्रधान. सत्तेवर येताच त्यांनी अमेरिकेशी सलगी आणि उत्तर कोरियाशी वैर केले आणि संरक्षण आणि आर्थिक बाबींत सुधारणांना हात घातला, पण निवृत्तीवेतन यादीतील घोळाने लाखो नागरिक त्रस्त झाले. अखेर जुलै २००७ मध्ये ‘एलडीपी’ने वरिष्ठ सभागृहात सत्ता गमावली. 

मोदींचा 70 वा जन्मदिवस दणक्यात होणार साजरा; वाढदिवसाची थीमही ठरली

ॲबे यांनी सत्तेपासून दूर असताना वादग्रस्त आणि अस्मितेच्या मुद्यांवर जोर देत लोकप्रियता मिळवली. अखेर, १६ डिसेंबर २०१२ ला ‘एलडीपी’ला सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळाले आणि ॲबे पुन्हा पंतप्रधान झाले. २०११ मध्ये भूकंप, सुनामीने हादरलेल्या जपानला सावरण्यासाठी ॲबे यांनी आर्थिक उपाययोजना केल्या. यालाच पुढे ॲबेनॉमिक्‍स म्हटले जाऊ लागले. ॲबे यांची आर्थिक जादू सुरवातीला चांगली चालली. बेरोजगारी घटली, वस्तूवापरात आणि करात वाढ झाली, पण एप्रिल २०१४ पासून आर्थिक घसरण होत, मंदी आली. ॲबे यांनी घटनादुरूस्ती केली, त्याने लष्कराला कोणी आक्रमण केल्यास बळाच्या वापराचा मार्ग खुला झाला. २०२० च्या ऑलिंपिकचे यजमानपद जपानला मिळाले, पण त्यासाठी स्टेडियम उभारणी, त्यावरील खर्च यावर टिका झाली. त्यांना कोलायटिसचा त्रास आहे. याच कारणास्तव त्यांनी २००७ मध्ये पंतप्रधानकी सोडली होती, यावेळी मात्र आजार बळावल्याने राजीनामा दिला आहे. 

भारत


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT