Kabul Blast Sakal
ग्लोबल

Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत स्फोट, 21 जणांचा मृत्यू; 60 जखमी

काबूलच्या पीडी 17 येथील मशिदीत बॉम्बस्फोट; खालिद जद्रान

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात २१ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी झाले आहेत, ज्यात ५ लहान मुलांचा समावेश. मिळालेल्या माहितीनुसार, खैर खाना परिसरातील मशिदीत हा स्फोट झाला. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. काबूल सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान स्फोटाची माहिती देताना यांनी सांगितले की, काबूलच्या पीडी 17 येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाला. ते म्हणाले की, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

गेल्या अनेक महिन्यांत असे अनेक हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये शिया मशिदींना लक्ष्य करण्यात आले. पण या हल्ल्यात एक नवीन गोष्टही समोर आली आहे. आज ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागात शिया लोकसंख्या नाही. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार आहे. तालिबान सरकारला आत्ता एक वर्ष पूर्ण झाले आहे. अश्रफ घनी यांचे सरकार हटवल्यानंतर तालिबानने तेथे ताबा मिळवला. 29 एप्रिल रोजी, काबूलमधील मशिदीमध्ये धार्मिक विधी करत असलेल्या अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य करण्यात आलेल्या हल्ल्यात 10 लोक मारले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT