old age parents
old age parents 
ग्लोबल

दीर्घायुषी व्हा! आता जगा १२० वर्ष; शास्त्रज्ञांनी लावला शोध

शर्वरी जोशी

दीर्घायुष्य मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. साधारणपणे माणूस सरासरी ८० वर्षांपर्यंत जगू शकतो. मात्र, मानवाची हीच वयोमर्यादा वाढविण्यासाठी गेल्या कित्येक काळापासून शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. विशेष म्हणजे इस्त्राइलच्या (Israel) शास्त्रज्ञांना या संशोधनात यश आलं आहे. त्यांनी उंदरांवर नवा प्रयोग केला असून त्यामुळे या उंदराचं आयुष्यमान २३ टक्क्यांनी वाढलं आहे. विशेष म्हणजे हे संशोधन जर मनुष्यावर लागू केलं तर मानवाची वयोमर्यादादेखील ८० वरुन १२० पर्यंत होण्याची शक्यता आहे. हा अभ्यास नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. (human-can-now-live-an-average-of-120-years-israeli-scientists-conduct-successful-experiment-on-mice)

इस्त्राइलच्या (Israel) वैज्ञानिकांनी केलेल्या संसोधनामध्ये एसआयआरटी 6 (SIRT6) नामक प्रोटीनचा पुरवठा वाढवून २५० उंदरांच्या आयुर्मानात तब्बल २३ टक्क्यांची वाढ केली आहे. 'टाइम्स ऑफ इस्त्राईल'च्या अहवालानुसार, एसआयआरटी 6 हे प्रथिन वयानुसार घटत असतं. त्यामुळेच वैज्ञानिकांनी या उंदरामधील एसआयआरटी 6 चा पुरवठा वाढवला. विशेष म्हणजे प्रथिनांचा हा पुरवठा वाढवल्यामुळे उंदरांच्या वयोमर्यादेत वाढ झाली आहे. हे तरुण पूर्वपेक्षा जास्त तरुण आणि सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच हा प्रयोग मानवावर केल्यास त्याचे आयुष्मान वाढविण्याचा हा सर्वात मोठा मार्ग ठरु शकतो.

ज्याप्रमाणे उंदरांमध्ये एसआयआरटी 6 चं प्रमाण वाढवून त्यांची वयोमर्यादा वाढवण्यात आली. तसंच एसआयआरटी 6 चे हे बदल मानवामध्येही करता येऊ शकतात. एसआयआरटी 6 मुळे वृद्धत्वाचे प्रमाण नियंत्रणात येते. त्यामुळेच येत्या दोन-तीन वर्षात मानवाचं आयुष्यमानदेखील वाढवता येऊ शकतं, असं बार-इलन विद्यापीठाचे प्राध्यापक हॅम कोहेन यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT