ग्लोबल

VIDEO व्हायरल झालेल्या 'त्या' C-17 च्या चाकाजवळ आढळले मृतदेह

सोमवारी अमेरिकन एअर फोर्सचे C-17 ग्लोबमास्टर विमान उड्डाणाच्या तयारीत असताना अफगाणि नागरिक या विमानासोबत धावत होते.

दीनानाथ परब

वॉशिंग्टन: अफगाणिस्तानात तालिबानची (Afganistan taliban) सत्ता येणार हे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर (Airport) मोठी गर्दी झाली होती. विमानात जागा मिळत नसल्याने काही अफगाण नागरिकांनी C-17 ग्लोबमास्टर विमानाच्या चाकाला (Wheel) लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. पण विमान आकाशात ठराविक उंचीवर गेल्यानंतर दोन जण या विमानातून खाली पडले. या भयानक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमेरिकेचे विशेष तपास कार्यालय सोमवारी काबूल विमानतळावर घडलेल्या या घटनेचा आढावा घेत आहे, असे अमेरिकन एअर फोर्सकडून सांगण्यात आलय. काही जणांचा या मध्ये मृत्यू झालाय. सोमवारी अमेरिकन एअर फोर्सचे C-17 ग्लोबमास्टर विमान उड्डाणाच्या तयारीत असताना अफगाणि नागरिक या विमानासोबत धावत होते. काहीजण चाकाजवळच्या भागामध्ये बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या घटनेत नेमका किती जणांचा मृत्यू झाला ते अमेरिकन एअर फोर्सने सांगितलेले नाही. पण कतारच्या उदीद एअर बेसवर C-17 ग्लोबमास्टरने लँडिंग केल्यानंतर विमानाच्या चाकाजवळ काही मृतदेह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. अफगाणिस्तानातील भयानक परिस्थितीची कल्पना देणाऱ्या या घटनेचे व्हिडीओ मोठया प्रमाणात सोशल मीडियावर पाहण्यात येत आहेत.

नागरिकांची सुटका करण्यासाठी आवश्यक साहित्य घेऊन C-17 ग्लोबमास्टर काबूल विमानतळावर दाखल झाले होते, असे अमेरिकन एअर फोर्सकडून सांगण्यात आले. विमानातून सामान बाहेर काढण्याआधीच शेकडो अफगाणि नागरिक सुरक्षा नियम मोडून विमानाभोवती जमले होते. तिथली सुरक्षा स्थिती अत्यंत वाईट होती. त्यामुळे क्रू ने पुन्हा विमान उड्डाणाचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT