Human Rights Commission of Sri Lanka Gotabaya Rajapaksa Mahinda Rajapaksa Appointed committee to investigate the shooting case  sakal
ग्लोबल

गोळीबाराच्या चौकशीसाठी समिती नियुक्त; श्रीलंका मानवाधिकार आयोग

मानवाधिकार आयोग; जगभरात निषेध, तिघे गंभीर

सकाळ वृत्तसेवा

कोलंबो : श्रीलंकेच्या नेऋत्य भागातील रामबुक्काना येथे काल गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अध्यक्ष गोटाबया राजपक्ष आणि पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांनी शोक व्यक्त केला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू तर १३ जण जखमी झाले होते. दरम्यान, या घटनेचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही तीव्र पडसाद उमटले असून घटनेचा निषेध करण्यात आला आहे. श्रीलंकेतील मानवाधिकार आयोगाने या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. तसेच श्रीलंकेच्या सुरक्षा विभागाने देखील घटनेची चौकशी सुरू केली आहे.

रामबुक्काना येथे इंधन दरवाढीवरून तीव्र आंदोलन सुरू असून कालच्या हिंसाचारानंतरही संचारबंदी कायम राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. काल जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि १३ जण जखमी झाले. रामबुक्कानाच्या केगाले रुग्णालयात १३ जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी जगत अल्विस यांनी म्हटले की, आंदोलकांनी ३३ हजार लिटर इंधनाने भरलेले टँकर पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीलंकेतील गोळीबाराचा जगभरातून निषेध होत आहे. अमेरिका, युरोपिय संघ आणि संयुक्त राष्ट्राच्या दूतावासांनी निवेदन जारी करत गोळीबारावर टीका केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थायी समन्वयक हना सिंगर हमदी यांनी गोळीबाराबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच श्रीलंकेला मदत करण्यासाठी जागतिक बँकेने पुढाकार घेतला असून अर्थसाह्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने खाते उघडले, प्रभाग 16 मधून चारही उमेदवार विजयी

मुंबईत पहिला विजय काँग्रेसचा, भाजपचे नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर विजयी; आतापर्यंत कुणी मारली बाजी?

Kolhapur Election Breaking News : सतेज पाटलांना तगडा झटका, हायव्होल्टेज लढतीत शारंगधर देशमुख विजयी; महायुतीचा सर्व जागांवर विजय

Pune Municipal Corporation Election Results : पुण्यात पहिल्या निकालात भाजपने मारली बाजी; तीन उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला एक जागा

Nagpur Municipal Election Results 2026 : नागपूर महापालिकेचे पहिले कल समोर, भाजपची मुसंडी, तब्बल ६५ जागांवर आघाडी

SCROLL FOR NEXT