Elon Musk  esakal
ग्लोबल

#GoodByeTwitter : Elon Muskच्या भीतीने ट्वीटरचे उरलेले कर्मचारी स्वतःहून सोडतायत नोकऱ्या

इलॉन मस्कने यापूर्वीच ट्विटरच्या अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

इलॉन मस्कने ट्वीटर विकत घेतल्यानंतर या कंपनीत मोठे बदल होत आहेत. मस्कने अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकलं असून आता उरलेले कर्मचारी स्वतःच राजीनामा देत आहेत. हे होतंय इलॉन मस्कच्या एका मेलमुळे. काय आहे या मेलमध्ये?

ट्वीटरने बऱ्याच कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. अगदी एवढं तात्काळ की घरातून बाहेर पडत असाल तर मेल चेक करा, मेल आला असेल तर येऊ नका, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. या मोठ्या ले ऑफमधून जे कर्मचारी वाचले त्यांनाही मस्कने आता अडचणीत टाकलं आहे. पूर्ण क्षमतेने जास्तीत जास्त तास काम करा नाहीतर तुमचे उरलेले पैसे घेऊन नोकरी सोडा, असा मेल इलॉन मस्कने केला आहे.

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

हा प्रस्ताव स्विकारण्यासाठी इलॉन मस्कने वेळेची मर्यादाही दिली होती. न्यूयॉर्कच्या वेळेनुसार, १७ नोव्हेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपला निर्णय देणं आवश्यक करण्यात आलं होतं. यानंतर अनेकांनी ट्वीट करत राजीनामे दिले आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर याविषयी भाष्य करत आपले व्हिसाबद्दलच्या समस्या, तसंच कंपनीकडून पैसे मिळतील का असे प्रश्न मांडले आहेत. मस्क ट्विटरचा नवा मालक झाल्यापासून अजून महिनाही झालेला नाही. मात्र तेवढ्यात त्याने ७,५०० एकूण कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT