ग्लोबल

Murder in London: स्वप्न राहिलं अधुरं! उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या भारतीय विद्यार्थीनीला फ्लॅटमेटनं भोसकलं!

ज्या फ्लॅटमध्ये ती राहत होती तिथं तिला एक आठवडाही झाला नव्हता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : उच्चशिक्षणसाठी लंडनमध्ये असलेल्या एका भारतीय विद्यार्थीनीची तिच्या फ्लॅटमेटनं चाकून भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून स्थानिक पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. एनडीटीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Hyderabad Student Stabbed To Death By Brazilian Flatmate In London)

तेजस्वीनी रेड्डी (वय २७, मूळ गाव हैदराबाद. सध्या लंडन) या भारतीय विद्यार्थीनीवर लंडनमध्ये तिचा फ्लॅटमेट असलेल्या एका ब्राझिलिअन तरुणानं हल्ला केला आहे. या चाकू हल्ल्यात तेजस्वीनीचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. लंडनच्या वेम्बली इथं मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Marathi Tajya Batmya)

माध्यमांतील वृत्तानुसार, तेजस्वीनी उच्च शिक्षणासाठी युकेमध्ये गेली होती. गेल्या आठवड्याभरापूर्वीच तीनं राहण्यासाठी एका फ्लॅटची निवड केली होती. या फ्लॅटमध्ये ती इतर काही विद्यार्थी-विद्यार्थींनीसोबत राहत होती. यामध्ये एका ब्राझीलच्या विद्यार्थ्याचा देखील समावेश होता, याच विद्यार्थ्यानं तिच्यावर हल्ला केला आहे.

चाकू हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तेजस्वीनीला एका २८ वर्षीय महिलेनं तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी लंडन पोलिसांनी एका २३ वर्षीय महिलेसह एका पुरुषाला अटक केली आहे. त्यानंतर या ब्राझिलीन तरुणाला पोलिसांनी कस्टडीत घेतलं असून महिलेवर कुठलीही कारवाई न करता तिला सोडून दिलं. (Latest Marathi News)

आरोपीचे फोटो प्रसिद्ध

दरम्यान, तेजस्वीनीवर हल्ला करणाऱ्या केवन अँटोनिओ लॉरेन्स्को डे मोराईस नामक ब्राझिलियन तरुणाचे फोटो लंडन पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत. हे फोटो पाहून नागरिकांकडून त्याचा पत्ता कळू शकेल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT