cris galera (source - insta) 
ग्लोबल

"मी विकाऊ नाही" म्हणत मॉडेलनं नाकारला अरब शेखच्या लग्नाच्या प्रस्ताव

ब्रेकअपला कंटाळलेल्या या मॉडेलनं स्वतःशीच केलंय लग्न

सकाळ डिजिटल टीम

साओ पाउलो : वारंवार झालेल्या ब्रेकअपला कंटाळून ब्राझिलच्या एका मॉडेलनं चक्क स्वतःशीच लग्न केल्याचा अजब प्रकार घडला आहे. पण यानंतर तिच्या जीवनात एक नवा ट्विस्ट आला. तिच्या सौंदर्यावर भाळून एका अरब शेखनं तिला चक्क लग्नाची मागणीच घातली. यासाठी शेखनं तिला ५ लाख डॉलर अर्थात ३ कोटी रुपयांच्या हुंड्याची ऑफरही दिली. मॉडेल क्रिस गॅलरा (Cris Galera) हीनं एका मुलाखतीत हा खुलासा केला.

cris galera

क्रिस गॅलरा या ३३ वर्षीय मॉडेलचा काही दिवसांपूर्वी आपल्या बॉयफ्रेन्डशी ब्रेकअप झालं. यानंतर ती एकटीच राहत होती. यापूर्वी अनेकदा तिची रिलेशनशिपमध्ये फसवणूक झाल्यानं तिनं एक मोठा निर्णय घेतला. आपल्याला फसव्या पुरुषांची गरज नाही त्यापेक्षा आपण एकट्यानंच जीवन व्यतीत करुयात असं ठरवतं साओ पाउलो येथील एका चर्चेमध्ये जाऊन तिनं स्वतःशीच लग्न केलं. अशा प्रकारे एखाद्या मॉडेलनं स्वतःशीच लग्न करणं ही अजब गोष्ट होती, त्यामुळे क्रिस जगभरात चर्चेत आली. लग्नावेळी परिधान केलेल्या बोल्ड ड्रेसमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तिचे हे फोटो जेव्हा एका अरब शेखनं पाहिले तेव्हा तो तिच्या प्रेमातचं पडला आणि त्यानं तिला थेट लग्नाची मागणी घातली.

cris galera

अन् अरब शेखनं घातली लग्नाची मागणी

मॉडेल क्रिसनं डेली स्टार या वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की, जेव्हा माझ्या लग्नाची बातमी व्हायरल झाली तेव्हा माझ्या इन्स्टाग्रामवर अनेक मुलांचे मेसेज आले त्यांनी माझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यामधील एक मेसेज अरब शेखचा होता. त्यानं मला स्वतःला घटस्फोट देऊन त्याच्याशी लग्न करावं, अशी इच्छा व्यक्त केली. यासाठी त्यानं माझ्यासमोर ३ कोटी रुपयांचा हुंडा देण्याचा प्रस्ताव ठेवला. या विचित्र प्रपोजलवर आधी क्रिसनं खूप विचार केला आणि अखेर शेखला लिहिलं की, "मी विकाऊ नाही. मी तुला ओळखतंही नाही. केवळ पैशांसाठी मी तुझ्याशी लग्न करणार नाही. यानंतर मी या अरब शेखचं प्रपोजल रिजेक्ट केलं"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT