ग्लोबल

जर्मनीतील शाळेत आयडीयाची कल्पना

वृत्तसंस्था

मेन्झ-बर्टझेनहाईम- सोप्या आणि स्वस्त वायुवीजन यंत्रणेचा (डीआयवाय व्हेंटीलेशन सिस्टीम) वापर करून येथील एका माध्यमिक शाळेने कोरोनाविरुद्ध परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या विषाणूंना वाव मिळू नये म्हणून हवा खेळती ठेवावी आणि वातानुकुलन यंत्रणा बंद ठेवावी असा सल्ला दिला जातो. आता हिवाळा सुरू झाला असल्यामुळे खिडक्या उघड्या ठेवण्याचे वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच फ्रँक हेलैस या संशोधकाने तयार केलेली ही यंत्रणा वापरण्याचा स्वस्त आणि सोपा उपाय अवलंबण्यात आला.

या यंत्रणेची चाचणी फ्रँक यांनी प्रसिद्ध अशा मॅक्स प्लँक रसायनशास्त्र संस्थेत घेतली. वर्गातील ९० टक्के हवा शुद्ध राहते असे त्यांना आढळून आले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा 
सोफिया वेट्टीग या १८ वर्षीय विद्यार्थीनीने सांगितले की, मी शाळेतील लॉकरमध्ये जादा स्वेटर ठेवते. हवा थंड असल्यास वर्गात एकाग्रता साधणे मला शक्य होत नाही. अशावेळी शाळेने या यंत्रणेचा पर्याय काढल्याने मोठाच दिलासा मिळाला आहे.

या पद्धतीची कल्पना सुचताच फ्रँक कामाला लागले. चाचणी पूर्ण होताच त्यांनी पत्नीमार्फत शाळेचे मुख्याध्यापक रोलँड वोलोस्की यांची भेट घेतली. स्वतः संशोधक असलेल्या रोलँड यांनी वेळ न दवडता हिरवा कंदील दर्शविला.

फायदे काय
वर्गातील विद्यार्थ्यांनी श्वासावाटे आत घेतलेल्या हवेत विषाणू असू शकतात. वर्ग बंदिस्त असल्यास हवा खेळती राहू शकत नाही. तीच हवा श्वास-उच्छ्वासावाटे वर्गात राहून विषाणू संक्रमणाचा धोका वाढू शकतो. डीआयवाय व्हेंटीलेशन सिस्टीममुळे मात्र हवा खेळती राहते. वर्गातील हवा सातत्याने बाहेर फेकली जाऊन ताजी हवा मिळते.

किफायतशीर
फ्रँक यांची कमी वजनाची यंत्रणा तयार करण्यासाठी साधारण २०० युरो इतका खर्च येतो. कोणत्याही अत्याधुनिक यंत्रांइतकाच परिणाम ती साध्य करते. मोजक्या स्वयंसेवकांच्या साथीत अर्ध्या दिवसात ही यंत्रणा तयार करण्यात आली.

उत्तम प्रतिसाद
इच्छुकांसाठी याचा तपशील संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार जणांनी चौकशी केली असून अधिकाधिक शाळांत यंत्रणा बसविली जाईल अशी आशा फ्रँक यांना वाटते.

डीआयवाय विषयी
डीआयवायचे डू-इट-युवरसेल्फ असे दीर्घ रूप आहे. तांत्रिकदृष्ट्या खुल्या स्रोताचा वापर केला जातो. 
    स्वयंपाकघरातील एक्ट्रॅक्टर फॅनप्रमाणे चालतो
    वर्गातील प्रत्येक डेस्कवर प्लॅस्टीकचे मोकळे आडवे नरसाळे
    नरसाळे अरुंद पाईप जोडून ते मोठ्या पाईपला जोडणे
    त्यास पंखा जोडला जातो
    पंख्याच्या बाजूला तिरपी खिडकी, ज्यातून हवेचा प्रवेश, जी खेळती राहते
    ताजी हवा मिळावी म्हणून आणखी एक खिडकी अर्धी उघडी ठेवली जाते    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT