if early election not announced caveat pakistan imran khan supreme court Islamabad Sakal
ग्लोबल

निवडणूक न झाल्यास यादवी : इम्रान खान

मुदतपूर्व निवडणूक जाहीर झाली नाही तर देशात यादवी संघर्ष उसळेल, असा इशारा पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद : मुदतपूर्व निवडणूक जाहीर झाली नाही तर देशात यादवी संघर्ष उसळेल, असा इशारा पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे.सत्ता गमावल्यापासून इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने आंदोलन तसेच निषेध मोर्चांवर भर दिला आहे. आंदोलकांना संरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर निकाल लागताच मोर्चाची पुढील तारीख जाहीर केली जाईल. गेल्या बुधवारी इम्रान यांनी इस्लामाबादच्या दिशेने मोर्चा नेला. त्यानंतर धरणे धरण्याचा इशारा त्यांनी दिला होता, मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी पवित्रा बदलला.

सरकारने मुदतपूर्व निवडणुकांची तारीख सहा दिवसांत जाहीर करावी अन्यथा धरणे धरू, असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रीय असेंब्लीमध्ये परतण्याचा प्रश्नच नाही, कारण तसे केल्यास आपले सरकार हटविण्याच्या कट स्विकारल्यासारखे होईल, असेही इम्रान यांनी स्पष्ट केले. इम्रान यांना अविश्वास ठरावानंतर हटविण्यात आले. यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

निवडणूक व्हाव्यात म्हणून आम्हाला कायदेशीर आणि घटनात्मक मार्गांचा अवलंब करू दिला जातो की नाही हे आपण पाहूया. अन्यथा हा देश यादवीच्या दिशेने जाईल.

- इम्रान खान, पीटीआयचे प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Alternative India : एलपीजीला नवा स्वस्त पर्याय! महागड्या सिलिंडरपासून सुटका, इथेनॉलवर बनणार स्वयंपाक; सरकारची योजना ठरणार गेमचेंजर

मुलाने लग्नाचा निर्णय सांगितल्यावर प्रसाद-मंजिरीने दिलेली अशी प्रतिक्रिया; "तो खूप इमोशनल झाला"

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

SCROLL FOR NEXT