ग्लोबल

धो-धो पाऊस पडतोय? तर मग ऑफिसमधून जाता येणार घरी!

वृत्तसंस्था

सिडनी : पावसाळा सुरु होताच अनेकांना वेध लागतात ते रोड ट्रिप आणि डोंगरांवर फिरायला जाण्याचे. हिरव्यागार घाटांत गरमागरम भजी आणि चहा घेत पावसाची मजा घेणे म्हणजे पर्वणीच. मात्र, अशा वेळी रोज धोधो पावसात ऑफिसला जाणं किती कंटाळवाणं असतं हे काही वेगळं सांगायला नको. अशातच मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये पाणी तुंबून कर्मचाऱ्यांचे होणारे हाल काही केल्या संपत नाहीत. ऑस्ट्रेलियामध्ये मात्र, सरकारने यावर वेगळी शक्कल लढविली आहे. धोधो पाऊस पडत असल्यास कर्मचाऱ्यांना त्याक्षणी ऑफिसमधून घरी निघता येऊ शकते. 

सध्या ऑस्ट्रेलियातील हवामान अत्यंत खराब असल्याने थंड वारे वाहत आहेत आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत तर काही ठिकाणी गारांचा पाऊसह होत आहे. तसेच काही ठिकाणी अचानक हवामानात घट होत आहे. अशा वातावरणाचा सर्वाधिक फटका ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसतो. 

त्यामुळेच ऑस्ट्रेलियामध्ये कार्यालयीन कामासंबधीत निर्णय घेणाऱ्या न्यायाधिकरणाने धोधो पाऊस सुरु झाल्यास कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून जाण्याची मुभा दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde Jayant Patil : जयंत पाटील आणि शशिकांत शिंदेंमध्ये दुरावा?, शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं; कोल्हापुरातून पक्षाची बांधणी करणार

"पॉकेटमनीसाठी बाप पाहिजे आदर करण्यासाठी नको" सावत्र भावाचे प्रतीक बब्बरवर आरोप; "आता त्यांना बाबा म्हणत नाही"

IPL 2026: पंजाब किंग्सच्या मार्गातील मोठी 'अडचण' दूर! LSG साठी पाचशेहून अधिक धावा करणारा फलंदाज संघाबाहेर

Crime: अल्पवयीन भाचीची छेड काढली, नंतर पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून मामाला एकट्यात गाठलं अन्... ठाण्यात रक्तरंजित थरार

Marathi Live News update: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

SCROLL FOR NEXT