India-Canada Row 
ग्लोबल

India-Canada: भारत की कॅनडा, वेळ पडल्यास कोणाला निवडणार? अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं

कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- कॅनडा आणि भारतामधील संबंध ताणले गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केलेत. भारत सरकारने खलिस्तान समर्थन व्यक्तीची हत्या केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. अमेरिकेने देखील भारताला सुनावलं असून या प्रकरणात सहकार्य करण्याच्या सल्ला दिला आहे. यापार्श्वभूमीवर कॅनडा विरुद्ध भारत यांच्यामध्ये अमेरिकेची कोणाला पसंती असेल असा प्रश्न निर्माण होतो.

अमेरिकेचे माजी पॅन्टेगॉन अधिकारी मायकल रुबिन यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, अमेरिकेला जर ओटावा आणि नवी दिल्ली यांच्यामध्ये एकाची निवड करण्याची वेळ आली, तर नक्कीच भारताची निवड केली जाईल. कारण अमेरिका आणि भारताचे संबंध खूप महत्त्वाचे आहेत. (If US Has To Pick India Or Canada)

रुबिन म्हणाले की, भारत हा अमेरिकेसाठी धोरणात्मक दृष्या खूप महत्त्वाचा सहकारी आहे. त्यामुळे ओटावा आणि नवी दिल्ली या दोघांमधील निवड म्हणडे मुंगी आणि हत्ती यांच्यामधील निवडीसारखी आहे. कॅनडाचे पंतप्रधान जास्त दिवस पदावर राहणार नाही. त्यानंतर पुन्हा आम्ही कॅनडाची चांगले संबंध निर्माण करु शकतो.

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांनी जो आरोप केलाय त्यातून ते आता माघार घेऊ शकत नाहीत. ट्रुडो यांनी पुरावे सादर केलेले नाहीत. त्यांना उत्तर द्यावं लागेल की ते दहशतवाद्यांना आश्रय का देत आहेत, असा सवाल रुबिन यांनी विचारला आहे. हरदिप सिंग निज्जर हा दहशतवादी होता. त्याला जून महिन्यात कॅनडामध्ये गोळी मारण्यात आली होती.

दोन्ही मित्रांपैकी एकाची निवड करण्याची अमेरिकेवर वेळ येऊ नये. पण, एकाची निवड करण्याची वेळ आलीच तर भारताचा पसंती दिली जाईल. कारण निज्जर हा दहशतवादी होता आणि भारत हा आमच्यासाठी महत्त्वाचा देश आहे. दोन्ही देशातील संबंध जास्त महत्त्वाचे आहेत, असं मायकल रुबिन म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT