Joe Biden टिम ई सकाळ
ग्लोबल

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींची हत्या झाली तर? अमेरिकेने सांगितली योजना

सकाळ डिजिटल टीम

आज रशियाा-युक्रेन या दोन्ही देशात सुरु असलेल्या युद्धाचा आज १२ वा दिवस असून या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या चर्चेची आज तिसरी फेरी पार पडणार आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर बोलणार आहेत. याबाबतची माहिती भारत सरकारमधील सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, या हल्ल्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची हत्या झाली तर पुढील योजना काय असेल याबद्दलचा खुलासा अमेरिकेने केला आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकने यांनी याबाबत म्हटलंय की, जर रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष मारले गेले तर पुढील योजना काय असेल याचं व्यवस्थित नियोजन युक्रेनकडून करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष सातत्याने रशियाने आपल्याला ठार मारण्याचा आदेश दिला गेल्याचा दावा करत आहेत. युक्रेनच्या दाव्यानुसार, झेलेन्स्की यांना ठार करण्यासाठी रशियामधील अनेकजण कीव्ह शहरात उपस्थित आहेत. त्यांना झेलेन्स्की यांची हत्या करण्याचा आदेश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अँटोनी ब्लिंक यांनी झेलेन्स्की यांची हत्या होण्याची भीती व्यक्त करताना पुढे म्हटलंय की, “युक्रेन सरकारचं नेतृत्व उल्लेखनीय आहे. मी युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोललो असून त्यांनी सरकार अस्थिर होऊ नये यासाठी आमच्या देशाकडे योजना तयार असल्याचं सांगितलंय”.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT