Illegal Police outposts set up by China 30 police stations open in 21 countries Beijing
Illegal Police outposts set up by China 30 police stations open in 21 countries Beijing sakal
ग्लोबल

चीनने उभारली अवैध ठाणी; कॅनडासह २१ देशांमध्ये ३० पोलिस चौक्या सुरू

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग : तिसरी महासत्ता अशी ओळख प्रस्थापित करणाऱ्या चीनने अनेक देशांमध्ये अवैध पोलिस ठाणी सुरू केली आहेत. कॅनडा, आयर्लंड यांसारख्या विकसित देशांमध्ये चिनी पोलिस ठाणी सुरू केली आहेत. ‘इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम रिपोर्टिका’ने स्थानिक माध्यमांचा हवाल देत म्हटले आहे, की चिनी पोलिस ‘फुझो’ने संपूर्ण कॅनडात पब्लिक सिक्युरिटी ब्युरो (पीएसबी) संलग्न असणाऱ्या अशा अनौपचारिक पोलिस सेवा सुरू केल्या आहेत. ग्रेटर टोरांटो भागात तीन चौक्या आहेत. चीनला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी ही योजना चीनने आखली आहे. तसेच या पोलिस चौक्यांच्या मदतीने चीन सरकार संबंधित देशांमधील निवडणुकांतही हस्तक्षेप करीत असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. याउलट आंतरराष्ट्रीय गुन्हे हाताळण्यास या चौक्या सक्षम असल्याचा दावा चीनने केला आहे.

फुझो पोलिसांच्या माहितीनुसार २१ देशांमध्ये अशा ३० चौक्या उभारल्या आहेत. युक्रेन, फ्रान्स, स्पेन, जर्मनी आणि ब्रिटन अशा देशांमध्ये चिनी पोलिस ठाणी आहेत आणि यातील अनेक देशांचे नेते सार्वजनिक व्यासपीठांवरून चीनमधील वाढत्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल सवाल करीत असतात.

चीनचा दावा

विविध देशांमध्ये सुरू केलेल्या पोलिस चौक्या म्हणजे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रे आहेत. विदेशात राहणाऱ्या चिनी नागरिकांना स्थानिक पोलिस तक्रारी दाखल करणे आणि अन्य कामांमध्ये मदत करण्यासाठी अशी ठाणी सुरू केली आहेत. चिनी सरकारी माध्यमांनुसार या पोलिस ठाण्यांच्या माध्यमांतून आरोपींना चीनला परत पाठविण्यास भाग पाडले जाते.

मानवी हक्क कार्यकर्त्यांचा दावा

सुरक्षेच्या नावाखाली चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीकडून देशात अत्याचार करीत असल्याचा आरोप मानवी अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. यामध्ये लोकांना नजरकैद करणे, कुटुंबांना जबरदस्तीने वेगळे करणे आणि नसबंदीसाठी सक्ती करणे, अशा प्रकारची छळवणूक केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT