IMF-chief-economist-gita-gopinath google
ग्लोबल

गीता गोपीनाथ देणार IMF चा राजीनामा, 'हे' आहे कारण

सकाळ डिजिटल टीम

भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ (IMF chief economist gita gopinath) या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा येत्या जानेवारी महिन्यात राजीनामा देणार आहेत. याबाबत आंतराराष्ट्रीय नाणेनिधीने एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे. गीता या परत हार्वर्ड विद्यापीठात जाणार आहेत.

गीता यांचा जन्म म्हैसूरचा असून त्या आंतराराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ पदावर २०१९ मध्ये रुजू झाल्या होत्या. त्यापूर्वी त्या हॉर्वर्ड विद्यापीठात जॉन झ्वान्स्त्र आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. हॉवर्डने त्यांना एक वर्ष रजा वाढवून ३ वर्ष आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सेवा देण्याची संधी दिली होती. आता आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी गीता यांच्यानंतर या पदासाठी लवकरच कर्मचाऱ्याचा शोध घेतला जाईल, अशी घोषणा केली आहे. तसेच गीता यांच्या कामाचे कौतुक देखील केले आहे. कोरोना महामारीच्या काळात गीता यांनी महत्वपूर्ण विश्लेषणाचे काम केले असून आयएमएफच्या सर्वोच्च अर्थतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. गीता यांचे योगदान खरोखर उल्लेखनीय आहे. आंतरराष्ट्रीय वित्त आणि मॅक्रोइकॉनॉमिक्सच्या त्याच्या सखोल आकलनाचा आम्हाला खूप फायदा झाला, असेही क्रिस्टलिना म्हणाल्या.

कशी झाली होती निवड? -

गीता गोपिनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पुढील शिक्षण घेतलं. त्यानंतर वॉशिंगटन विद्यापीठामध्ये त्यांचं पुढील शिक्षण झालं. त्यानंतर २००१ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीचएडी केली. त्याचवर्षी शिकागो विद्यापीठात सहाय्या प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT