ग्लोबल

Israel Hamas War: गाझा पट्टीत आतापर्यंत २०,००० जणांचा मृत्यू, तर १९ लाख लोक झाले विस्थापित

Israel Hamas War: दुसऱ्या एका बाँबस्फोटात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला. वास्तविक दक्षिण गाझामध्येही राफाही सर्वांत दक्षिणेला आहे. सामान्य नागरिकांना हल्ल्यांची झळ पोहोचू नये म्हणून सर्वांनी याच शहराच्या परिसरात जावे, असे इस्राईलनेच आवाहन केले होते. तरीही येथे थेट हल्ले होत असल्याने चिंता वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Israel Hamas War: इस्राईलने आज दक्षिण गाझामध्ये जोरदार केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान २८ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच, आधीच उद्ध्वस्त झालेल्या उत्तर गाझामध्येही कारवाई सुरूच ठेवताना सैनिकांनी कामकाज सुरू असलेल्या अखेरच्या रुग्णालयावरही छापे घालत जोरदार हल्ले केले.

इस्राईलच्या लढाऊ विमानांनी आज दक्षिण गाझामध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले. उत्तर गाझामधील हल्ल्यांनंतर लाखो पॅलेस्टिनी नागरिक दक्षिण गाझामध्ये स्थलांतरित झाले असताना याच भागात हल्ले वाढविण्यात आले आहेत. राफा शहरातील एका इमारतीवर बाँब पडून २५ जणांचा मृत्यू झाला. या इमारतीत राहणारे सर्वजण स्थलांतरित होते.

दुसऱ्या एका बाँबस्फोटात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला. वास्तविक दक्षिण गाझामध्येही राफाही सर्वांत दक्षिणेला आहे. सामान्य नागरिकांना हल्ल्यांची झळ पोहोचू नये म्हणून सर्वांनी याच शहराच्या परिसरात जावे, असे इस्राईलनेच आवाहन केले होते. तरीही येथे थेट हल्ले होत असल्याने चिंता वाढली आहे.

गाझा पट्टीतील हानी

मृत्यू : २०,०००

विस्थापित : १९ लाख (८० टक्के)

उत्तर गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त

दक्षिण गाझामधील अनेक शहरांमध्ये हानी

वीज, पाणी, अन्न, औषध यांचा तुटवडा

रुग्णालयाच्या भिंती पाडल्या

उत्तर गाझामधील अनेक रुग्णालयांवर हल्ले करून त्यांना ‘जर्जर’ करणाऱ्या इस्राईलने गाझात कार्यरत असलेल्या अखेरच्या रुग्णालयावरही छापे घातले. सैनिकांनी रुग्णालयाच्या कुंपणभिंती बाँबने पाडून प्रवेशद्वारही तोडले. इस्राईलच्या सैनिकांनी रुग्णालयातील बहुतेक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

आता या रुग्णालयात शंभरहून अधिक जखमी रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दोन डॉक्टर, चार परिचारिका आणि दोन वॉर्ड बॉय इतकेच जण शिल्लक आहेत. या रुग्णालयाभोवती रणगाडे उभे करण्यात आले. सामान्य नागरिकांच्या आडून हमासचे दहशतवादी हल्ले करत असल्यानेच ही कारवाई करावी लागत असल्याचा इस्राईलचा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT