Imran Khan fears arrest Imran Khan fears arrest
ग्लोबल

इम्रान खान यांना अटकेची भीती; ठेवल्या तीन अटी

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी इम्रान खान (Imran Khan) यांनी विरोधकांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. इम्रान खान यांनी मतदानासाठी तीन अटी ठेवल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाने केला आहे. इम्रान खान यांना खुर्ची गमावल्यानंतर अटकेची भीती सतावत आहे. अशा स्थितीत पद सोडल्यानंतर अटक करू नये, अशी पहिली अट इम्रान खान यांनी ठेवली आहे. (Imran Khan fears arrest)

पाकिस्तानी (Pakistan) मीडिया जिओ टीव्हीनुसार, इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावापूर्वी विरोधकांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. इम्रान खान यांची पहिली अट आहे की, पद सोडल्यानंतर त्यांना अटक करू (Imran Khan fears arrest) नये. दुसरी अट म्हणजे त्याच्यावर एनबीएअंतर्गत गुन्हा दाखल करू नये. तिसरी अट म्हणजे विरोधी पक्षाने शाहबाज शरीफ यांना त्यांच्यानंतर पाकिस्तानचे नवे वझीर-ए-आझम बनवू नये. शाहबाज व्यतिरिक्त अन्य कोणाला तरी पंतप्रधान करावे. मात्र, या प्रकरणी इम्रान खान यांच्या अटींवर विरोधकांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.

मंत्र्यांनी बदलले ट्विटर बायो

इम्रान खान (Imran Khan) सरकारचे केंद्रीय माहिती आणि कायदा मंत्री फवाद चौधरी यांनी त्यांचे ट्विटर बायो बदलले आहे. त्यांनी आता स्वत:चे माजी केंद्रीय माहिती आणि कायदा मंत्री म्हणून वर्णन केले आहे. फवाद चौधरी यांच्यासोबतच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीही त्यांचे ट्विटर बायो बदलून स्वतःचे माजी परराष्ट्र मंत्री म्हणून वर्णन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT