Imran Khan will not have a presence at the UNs meeting 
ग्लोबल

इम्रान खान यांची 'यूएन'च्या सभेत उपस्थिती नसणार

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत उपस्थित राहणार नाही, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिली. इम्रान खान हे देशाच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष देणार आहेत, असेही ते म्हणाले.

कुरेशी म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाची 73 वी सर्वसाधारण बैठक 18 सप्टेंबरला सुरु होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान खान उपस्थित राहणार नाहीत. मात्र, पाकिस्तानच्या वतीने मी पाकिस्ताच्या मंत्रिमंडळाचे प्रतिनिधित्व करणार आहे. नवनिर्वाचित पंतप्रधान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सत्रामध्ये उपस्थित राहणार की नाही, याबाबत वादविवाद सुरु आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान सद्यस्थितीवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या सत्रामध्ये उपस्थित राहणार नाहीत, असे सांगितले जात आहे.  

दरम्यान, इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार हाती घेतला असून, सध्या ते पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर पुन्हा अपघात, ट्रकचा ब्रेक झाला फेल

'ते' पुन्हा आले...! निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक, चला हवा येऊ द्या नाहीतर 'या' शोमध्ये दिसणार जोडी

Latest Marathi News Live Update : पुण्यात ई-स्क्वेअर थिएटरजवळ प्रचंड वाहतूक कोंडी

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिराचा परिसर होणार आणखी मोठा; बाहेरील भिंतीजवळची जमीन खरेदी करण्याचा निर्णय का?

Lionel Messi In India : ‘वानखेडे’वर मेस्सीचा ‘जयघोष’; फुटबॉलप्रेमींच्या शिस्तबद्धतेला सलाम; सचिन-लियोनेल एकत्र...

SCROLL FOR NEXT