Imran Khan Sakal
ग्लोबल

इम्रानना हवी होती झरदारींची मदत

ध्वनिफित उघडकीस; ‘पीटीआय’कडून इन्कार

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद - अडचणीत आलेली सत्ता वाचविण्यासाठी पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, असे एका ध्वनिफितीवरून उघडकीस आले आहे.

पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर असिफ अली झरदारी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील बडी आसामी असलेल्या मलिक रियाझ हुसेन यांच्यातील संभाषणाची ध्वनिफित व्हायरल झाली आहे. इम्रान खान यांना तुमच्याशी बोलणी करण्याची इच्छा आहे, ते मला सारखे मेसेज पाठवत आहेत, असे हुसेन हे झरदारी यांना सांगत असल्याचे या ध्वनिफितीत ऐकू येत आहे. हुसेन यांच्या बोलण्यावर झरदारी यांनीही ‘आता हे शक्य नाही,’ असे म्हटल्याचे ध्वनिफितीत आहे. ही ध्वनिफित बनावट असल्याचा दावा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाने (पीटीआय) केला असला तरी झरदारी यांच्या समर्थकांनी मात्र तो खरा असल्याचे म्हटले आहे.

पाकला मदत मिळण्याची आशा

आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळण्याची आशा वाटत आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला दिलासा म्हणून त्यांच्यावरील कर्ज काही प्रमाणात माफ करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने नाणेनिधीसमोर ठेवला असून तो पुढील महिन्यात मंजूर होण्याची शक्यता अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी आज व्यक्त केली. पाकिस्तानला पुढील आर्थिक वर्षात ३६ ते ३७ अब्ज डॉलर मदतीची आवश्‍यकता असल्याचेही इस्माईल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT