Taliban Sakal
ग्लोबल

भारतीय अधिकाऱ्यांचा गट तालिबानी नेत्यांच्या भेटीला; 'या' विषयावर चर्चा

तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतरचा हा पहिलाच दौरा असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदाच भारत सध्या अफगाणिस्तान दौऱ्यावर आहे. परराष्ट्र मंत्रालयातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गट सध्या काबूल दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यामध्ये हा गट तालिबानच्या काही प्रमुख सदस्यांची भेट घेणार आहे. (Indian team on Kabul visit, Discussion with Taliban)

या दौऱ्यात अफगाणिस्तानच्या लोकांना मानवतावादी सहकार्य देण्याबद्दल भारताच्या वतीने चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. अफगाणिस्तानला मानवतावादी सहाय्य पुरवण्याविषयी देखरेख करणं हा या चर्चेचा उद्देश असणार आहे. अशी मदत पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनाही अधिकाऱ्यांचा हा गट भेटणार आहे. भारतातर्फे जिथे प्रकल्प सुरू आहेत, तिथेही हा गट भेट देणार आहे.

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणचे संयुक्त मुख्य सचिव जे. पी. सिंग हे या गटाचं नेतृत्व करत आहेत. ते यापूर्वीही तालिबानच्या अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत. या आधीही अफगाणिस्तानातल्या लोकांना मानवतावादी सहाय्य पुरवण्याच्या मोहिमे अंतर्गत भारताने २०,००० मेट्रिक टन गहू, १३ टन औषधं, कोरोना प्रतिबंधक लसीचे ५ लाख डोस आणि थंडीपासून वाचण्यासाठी कपडे पुरवण्यात आले आहेत. हे साहित्य काबूलमधल्या इंदिरा गांधी बालरुग्णालयाकडे देण्यात आलं आहेत. भारत आणखी औषधं आणि धान्याचा पुरवठा अफगाणिस्तानला करणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT