america drone
america drone 
ग्लोबल

घातक AIR STRIKE मध्ये मोठी चूक झाल्याचं अमेरिकेनं केलं मान्य

दीनानाथ परब

वॉशिंग्टन: अमेरिकेने (America) मागच्या महिन्यात अफगाणिस्तानात मोठा एअर स्ट्राइक (Air strike) केला. इस्लामिक स्टेटचे (Islamic State) दहशतवादी या स्ट्राइकमध्ये मारले गेल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिक या एअर स्ट्राइकमध्ये बळी पडल्याचं आता समोर आलं आहे. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांचा (terrorist) नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचं अंतर्गत चौकशीतून समोर आल्याचं अमेरिकनं मान्य केलं आहे.

हा एअर स्ट्राइक आमची चूक होती, असे मरीन जनरल फ्रँक मॅकेंझी यांनी सांगितले. यूएस सेंट्रल कमांडचे ते प्रमुख आहेत. पेंटागॉनमधल्या पत्रकार परिषदेत चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. २९ ऑगस्टला अमेरिकेने हा एअर स्ट्राइक केला होता. नागरिकांसह लहान मुलांचा या स्ट्राइकमध्ये मृत्यू झाला होता. प्रसारमाध्यमांनी एअर स्ट्राइकमध्ये चूक झाल्याबद्दल आवाज उठवला होता.

लक्ष्य करण्यात आलेल्या वाहनाचा चालक अमेरिकेच्या मानवतेसाठी काम करणाऱ्या एका संस्थेचा कर्मचारी होता. वाहनामध्ये स्फोटके असल्याच्या पेंटागॉनच्या दाव्याची पुष्टी करणारे कुठले पुरावेही मिळाले नव्हते. या वाहनामुळे मोठा धोका निर्माण होईल, या समजातून एअर स्ट्राइक केल्याचे मॅकेंझी यांनी सांगितले. त्या एअर स्ट्राइकमध्ये १० नागरिकांचा मृत्यू झाल्याचं मॅकेंझी यांनी सांगितलं. यात सात लहान मुलं आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Pre-monsoon Rain : महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत आज बरसणार पूर्वमोसमी पावसाच्या सरी; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार निकाल

Latest Marathi News Live Update : तब्बल 10 वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल

T20 World Cup स्पर्धेसाठी संधी न मिळताच स्फोटक फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती; अनेक विक्रम आहेत नावावर

SCROLL FOR NEXT