Afganistan Army
Afganistan Army sakal
ग्लोबल

Afghanistan Crisis : काबूल विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात

दीनानाथ परब

काबूल: अफगाण सैन्याने (afgan army) शरणागती (surrender) पत्करल्यामुळे तिथे पुन्हा एकदा तालिबान राज येणार हे स्पष्ट झाले आहे. राजधानी काबूलवर तालिबानने (kabul taliban control) नियंत्रण मिळवलं आहे. सध्या प्रत्येक देश अफगाणिस्तातून आपल्या नागरिकांना सुरक्षितरित्या (citizen departure) बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय. अफगाणिस्तानात गोंधळाची स्थिती आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीचा अनुभ असलेले मूळ अफगाणी नागरिकही आपली मायभूमी सोडण्यासाठी मजबूर झाले आहेत.

अमेरिकने काबूलमधील हमीर करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेतलं आहे. पुढच्या ४८ तासांत अमेरिका अफगाणिस्तानात आपले ६ हजार सैनिक तैनात करणार आहे तसेच काबूलमधील विमानतळाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षही (ATC) ताब्यात घेणार आहे. आपल्या तसेच मित्र देशांच्या नागरिकांना अफगाणिस्तानातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचललं आहे. अमेरिका अफगाणिस्तानून ऑगस्ट अखेरपर्यंत निघणार हे स्पष्ट होताच, तालिबानने आक्रमक होत एक-एक प्रांत ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ते इतक्या लवकर काबूलपर्यंत पोहोचतील असे वाटले नव्हते. पण अफगाण सैन्याने शरणागती पत्करल्यामुळे चित्रच बदलले.

अफगाणिस्तानात राहणारे हजारो अमेरिकन नागरिक आणि दूतावासात काम करणारे स्थानिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही अमेरिकेत पाठवण्यात येणार आहे, असे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेच्या स्पेशल इमिग्रंट व्हिसासाठी पात्र असलेल्या हजारो अफगाणि नागरिकांना अमेरिकत पाठवण्याची प्रक्रियाही गतीमान करण्यात येणार आहे. मागच्या दोन आठवड्यात दोन हजार अफगाणि नागरिक आधीच अमेरिकेत दाखल झाले आहेत.

अफगाणि आणि आंतरराष्ट्रीय नागरिकांना देश सोडायचा असेल, तर त्यांना परवानगी दिली पाहिजे. रस्ते, विमानतळ आणि बॉर्डर क्रॉसिंग सुरु असलं पाहिजे. शांतता कायम राखली पाहिजे. अफगाणि नागरिकांना सन्मानाने आणि सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मदतीसाठी आम्ही तयार आहोत, असे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT