India and France agreed to implement kalpak project narendra modi and Emmanuel Macron sakal
ग्लोबल

भारत आणि फ्रान्स संरक्षण क्षेत्रात भागीदारी आणखी दृढ करणार

भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण क्षेत्रात असलेली सर्व प्रकारची भागीदारी आणखी दृढ करण्यास आणि ‘आत्मनिर्भर भारता’साठीच्या प्रयत्नांना आणखी बळ देणारे कल्पक प्रकल्प राबविण्यास दोन्ही देशांनी मान्यता दिली

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण क्षेत्रात असलेली सर्व प्रकारची भागीदारी आणखी दृढ करण्यास आणि ‘आत्मनिर्भर भारता’साठीच्या प्रयत्नांना आणखी बळ देणारे कल्पक प्रकल्प राबविण्यास दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे. कोरोना काळातही राफेल विमानांची निर्मिती करून ती भारतात दाखल झाल्याबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. युरोप दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात फ्रान्सला अल्पकाळासाठी थांबलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची काल (भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा) भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी संरक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबत चर्चा केली.

एकमेकांवरील विश्‍वास दृढ असल्याने आत्मनिर्भर भारतासाठीची प्रयत्नांमध्ये फ्रान्सचा सहभाग वाढविण्यासाठी नवीन उपाय शोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, उत्पादन आणि निर्यात, दोन देशांमधील उद्योगांमधील भागीदारी असे उपाय यासाठी सुचविण्यात आले आहेत. या शिवाय मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात हरित ऊर्जा आणि सागरी व्यापार सहकार्य या मुद्द्यांवरही चर्चा झाली. फ्रान्स दौऱ्यानंतर मोदी भारतात परतले.

फ्रान्ससमवेतच्या चर्चेतील ठळक मुद्दे

  • राष्ट्रीय संग्रहालय उभारणीत ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून फ्रान्सचे सहकार्य

  • युक्रेनमधील युद्ध तातडीने थांबविण्याचे दोन्ही देशांचे आवाहन

  • दहशतवादाचा एकत्रितपणे सामना करणार

  • हिंद-प्रशांत क्षेत्रातील मुक्त व सर्वसमावेशक वातावरणासाठी आग्रही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP Election Supreme Court : महाराष्ट्रातील २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, कोर्टाचा स्पष्ट शब्दात नकार

उड्डाणानंतर २० मिनिटांनी विमान रडारवरून बेपत्ता, ३ तासांनी कोसळलं; ७ जणांचा मृत्यू, रुग्णाला दिल्लीला नेताना दुर्घटना

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; सर्व तपासण्या नॉर्मल, उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

AUS vs IND: टी२० नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचा निर्धार, आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ODI मालिकेला सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Finance Minister Statement: बँकांकडून सोने खरेदीमुळे भाववाढ; अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण, परिस्थिती चिंताजनक नाही!

SCROLL FOR NEXT