Arindam Bagchi
Arindam Bagchi esakal
ग्लोबल

इस्राईल : दहशतवादी हल्ल्यांत पाच जणांचा मृत्यू; भारतानं व्यक्त केलं दु:ख

सकाळ डिजिटल टीम

इस्राईलच्या तेल अवीव शहरात झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झालाय.

तेल अवीव, इस्राईल : इस्राईलच्या तेल अवीव शहरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या गोळीबारात (Terrorist Attack On Israel) पाच जणांचा मृत्यू झालाय. महत्त्वाचं म्हणजे, गेल्या सात दिवसांत इस्राईलवर झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. आतापर्यंत या हल्ल्यांत 11 जणांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यानंतर भारतानं पीडितांच्या कुटुंबीयांप्रती दु:ख व्यक्त केलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी सांगितलं की, भारत इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध करत आहे. आम्ही या हल्ल्यात जीव गमावलेल्या कुटुंबीयांसोबत आहोत, असं त्यांनी म्हंटलंय.

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी ट्विटव्दारे दु:ख व्यक्त केलंय. त्यांनी लिहिलंय, आम्ही इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध करत आहोत. या हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांप्रती आमची संवेदना आहे. याआधी मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इस्रायलीचे बेंजामिन गँट्झ यांच्याशी संवाद साधून दहशतवादी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त केलं होतं. दहशतवाद हा संपूर्ण जगाला धोका असून त्याला सुसंस्कृत जगात स्थान नाही, असंही ते म्हणाले होते.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार तेल अवीव नजीक दोन ठिकाणी घडवून आणण्यात आला होता. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचा हल्ला रोखण्याच्या प्रयत्नात बळी गेला. मृतांत इतर चार सामान्य नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराला जागीच गोळ्या घालून ठार करण्यात आलं. हल्लेखोराचं नाव हमरशेहा असं होतं. तो २६ वर्षीय फिलिस्तानी नागरिक आहे. इस्राईलमध्ये तो अवैधरित्या राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये इस्राईलनं सुरक्षा संबंधी गुन्ह्यांसाठी त्याला अटक केली होती आणि त्याला सहा महिन्यांची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

पंतप्रधान बेनेट यांची प्रतिक्रिया

दहशतवादी घटनांनंतर पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी तातडीन सुरक्षा दलाची एक बैठकही घेतली. या बैठकीत तत्काळ उचलण्यात येणाऱ्या पावलांवर चर्चा झाली. इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी या दहशतवादी हल्ल्यांची निंदा करत अशा घटनांना कठोरतेनं तोंड देणार असल्याची प्रतिक्रिया दिलीय. तसंच त्यांनी पोलिसांना हाय अलर्टचे आदेश दिलेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT