tirumurti esakal
ग्लोबल

मुंबई बॉम्बस्फोट : गुन्हेगारांना सरकारी सुरक्षा, हॉटेल्सचा पाहुणचार?

सकाळ डिजिटल टीम

न्यूयॉर्क: 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना केवळ सरकारी संरक्षणच दिले गेले नाही तर त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुणचारही केला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (dawood ibrahim) पाकिस्तानमध्ये (pakistan) संभाव्य उपस्थितीच्या संदर्भात भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सांगितले.

'आंतरराष्ट्रीय दहशतवाद 2022' परिषद

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी 'ग्लोबल काउंटर-टेररिझम कौन्सिल' द्वारे आयोजित 'आंतरराष्ट्रीय दहशतवाद 2022' या परिषदेत सांगितले की, दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी कठोरपणे हाताळणे आवश्यक आहे. तिरुमूर्ती म्हणाले “आम्ही पाहिले आहे की 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्या क्राइम सिंडिकेटला केवळ सरकारी संरक्षण दिले गेले नाही तर पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुणचारही केला गेला

दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच

'डी-कंपनी' आणि त्याचा प्रमुख दाऊद इब्राहिम यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत तिरुमूर्ती यांनी हे वक्तव्य केले आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच लपून बसल्याचे मानले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये, सरकारने 88 प्रतिबंधित दहशतवादी गट आणि त्यांच्या नेत्यांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादल्यानंतर पाकिस्तानने प्रथमच इब्राहिमची आपल्या देशात उपस्थिती मान्य केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT