India-Canada Dispute eSakal
ग्लोबल

India Canada Conflict : कॅनडाने भारतातील 41 राजदूतांना बोलावलं माघारी; मुंबईसह तीन वाणिज्य दूतावासातील कामे रखडणार

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून तणावाखाली आहेत

रोहित कणसे

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून तणावाखाली आहेत. यादरम्यान कॅनडाने भारतातील 41 राजदूतांना माघारी बोलावलं आहे. याआधी भारताने या 41 राजदूतांना देश सोडण्याची सूचना केली होती. त्यानंतर य़ा राजदूतांना परत बोलवण्यात आले आहे. या दोन्ही देशांमध्ये तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

भारत आणि कॅनडा यांच्याच खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्तेनंतर तणाव सुरू आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी निज्जर याच्या हत्येचा आरोप भारतावर केल्याने हे प्रकरण चांगलंच पेटलं होतं.

दरम्यान कॅनडाच्या राजदूतांची 20 ऑक्टोबर रोजी Diplomatic Immunity संपणार होती. त्यामुळे कॅनडा सरकारने त्यांना पुन्हा मायदेशी बोलावलं आहे. परिणामी कॅनडाच्या मुंबईसहित तीन ठिकाणच्या वाणिज्य दूतावासातील कामे रखडणार आहेत.

भारताने जरी कॅनडाच्या राजदुतांना देश सोडण्याचे आदेश दिले असले तरी कॅनडा जशास तसं करणार नाही अशी भूमिका कॅनडाने घेतली आहे. पण हरदीप सिंह निज्जरच्या हत्येची चौकशी सुरुच राहणार, असं कॅनडाने म्हटलं आहे.

जूनमध्ये कॅनडामध्ये 45 वर्षीय खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरातील गुरु नानक शीख गुरुद्वारा साहिबच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी हत्येला दुजोरा देत सांगितले की, निज्जरची दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. निज्जर हा सरे येथील गुरू नानक शीख गुरुद्वारा साहिबचे अध्यक्ष होता आणि भारत सरकारच्या 'वॉन्टेड' यादीत त्याचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी राजकीय घडामोड! ठाकरे गटातील ६ बंडखोर खासदारांचे शिंदे सेनेत विलिनीकरण अधिकृत, लोकसभा सचिवालयाचा निर्णय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १८ जुलै २०२६ ते २४ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

IND vs ENG: "रोहित-विराट यांच्याशिवाय 2027 वर्ल्ड कप जिंकणे अवघड!", मेस्सीचं उदाहरण देत दिग्गज क्रिकेटर स्पष्टच बोलला

Shirur Gun Firing : जुन्या वादातून सात जणांनी एकावर पिस्तुलातून केला गोळीबार; जीव वाचविण्यासाठी तरूणाने मारली तळ्यात उडी

LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता सिलिंडरमधील उरलेल्या गॅसचा पूर्ण वापर होणार; तेल कंपन्यांचा नवा फॉर्म्युला काय?

SCROLL FOR NEXT