India Canada row FBI warned sikhs in us about death threats after Khalistan Nijjar murder reports 
ग्लोबल

India-Canada Row : तुमच्याही जीवाला धोका...; निज्जरच्या हत्येनंतर FBIने अमेरिकेतील खलिस्तान समर्थकांना केलं सावध; रिपोर्टमध्ये दावा

रोहित कणसे

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. यादरम्यान याप्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे अमेरिकेतील न्यूज पोर्टल 'द इंटरसेप्ट'ने दिलेल्या रिपोर्टमध्ये अमेरिकन एजन्सी एफबीआयकडून युएसमध्ये राहणाऱ्या खलिस्तान समर्थकांना सावध करण्यात आलं होतं असा दावा करण्यात आला आहे.

या रिपोर्टमध्ये खलिस्तान समर्थकांशी संपर्क साधून एफबीआयने त्यांच्या जीवाला देखील धोका असू शकतो असं सांगत सावध केलं होतं. मात्र त्यांना धोका कशापासून असू शकतो याबद्दल कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. या वर्षी १८ जून रोजी खलिस्तानी दहशतवादी निज्जर याची अज्ञातांनी गोळ्या झाडून गत्या केली होती. ज्यामध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान भारतावर करत आहेत. यानंतर दोन्ही देशांमध्य तणावाचे वातावरण आहे. निज्जर खलिस्तान टायगर फोर्सचा दहशतवादी होता, ज्याच्यावर भारताकडून बंदी घालण्यात आली होती.

अमेरिकन शीख कॉकस कमेटीचे संचालक प्रीतपाल सिंग यांनी द इटरसेप्टशी बोलताना सांगितले की, कॅलिफोर्नियामध्ये अनेक लोकांकडे एफबीआयकडून फोन करण्यात आले आणि निज्जरची हत्या झाल्याचे सांगण्यात आले. तसेच दोन स्पेशल एजेंट्स मला भेटायला देखील आले होते. ते म्हणाले की, माझ्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळाली आहे. मला सावध राहण्याची गरज आहे, मात्र त्यांनी कोणापासून सावध रहावे याबद्दल सांगितले नाही. नाव न सांगण्याचा अटीवर दोन इतर शीख समुदायातील नागरिकांनी देखील सांगितले की एफबीआय एजंट्स त्यांच्याकडे आले होते. मात्र एफबीआयने इंटरसेप्टला याबद्दल कुठलीही माहिती दिली नाही.

यादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी ते निज्जर हत्या प्रकरणात कॅनडाला मदत करत आहोत अशी माहिती दिली.

तसेच कॅनडामध्ये तैनात अमेरिकेचे राजदूत डेव्हिड कोहेन यांनी दावा केला आहे खी फाइव्ह आइज अलायन्सने दिलेल्या माहितीच्या आधारेच कॅनडाने भारतावर हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप केला आहे. मात्र कॅनडाने आतापर्यंत याबद्दल कुठलाही पुरावा दिला नाहीये, तसेच भारताने कॅनडाच्या राजदूतास देशातून काढून टाकले आहे सोबतच कॅनडाची व्हिजा सेवा देखील निलंबित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT