India-Canada Dispute Esakal
ग्लोबल

India-Canada Row : भारताविरुद्ध कॅनडाची नवी खेळी! दहशतवादी निज्जरच्या हत्येबद्दल पंतप्रधान ट्रूडोंचा पुन्हा मोठा दावा

रोहित कणसे

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हत्याकांड प्रकरणी नवा डाव टाकला आहे. ट्रूडो यांनी शुक्रवारी सांगितले की, कॅनडाने काही आठवड्यांपूर्वीच ब्रिटीश कोलंबियामध्ये खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमध्ये भारतीय एजंटांचा सहभाग असल्याचा पुरावा नवी दिल्लीशी शेअर केला होता.

ट्रूडो यांनी ओटावा येथे मीडियाशी बोलताना सांगितले की, कॅनडाने त्या विश्वसनीय आरोंपांबद्दल भारताला माहिती दिली आहे, ज्याबद्दल सोमवारी देखील मी बोललो होतो. आम्ही काही आठवड्यांपूर्वीच भारतासोबत याबद्दलची गुप्त माहिती शेअर केली होती. कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले की आम्हाला, आम्हाला भारतासोबत रचनात्मक काम करायचे आहे. आम्हाला आशा आहे की ते आम्हाला सहकार्य करतील जेणेकरून आम्ही या अत्यंत गंभीर प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ शकू.

पीएम ट्रूडो यांनी सोमवारी कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना कुठलेही पुरावे न देता काही आरोप केले होते. यामध्ये ब्रिटिश कोलंबिया येथील सरे येथे जून मध्ये झालेल्या खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र भारताने हे आपोप फेटाळले आहेत.

मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आळा आहे की कॅनडा सरकारने एक महिन्यापासून खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्येचा तपास केला जात आहे. या तपासात मानव आणि सिग्नल दोन्ही पद्धतीची गुप्त माहिती गोळा करण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये गुप्त माहितीमध्ये कॅनडामधील भारतीय अधिकाऱ्यांचे संभाषण इंटरसेप्ट केल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

या रिपोर्टनुसार फाइव्ह आयज अलायन्समध्ये सहभागी असलेल्या एका सहयोगीने काही माहिती दिली होती असेही सांगण्यात आले. फाइव्ह आय ग्रुप एक इंटेलिजेंस शेअरिंग नेटवर्क आहे ज्यात अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.

कोणतीही माहिती मिळाली नाही

भारत कॅनडा वादादरम्यान विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी शांगितले की, आम्ही देण्यात आलेल्या कोणत्याही विशिष्ट माहितीकडे लक्ष देण्यास तयार आहोत, असे गुरुवारी सांगितले होते, परंतु आतापर्यंत आम्हाला कॅनडाकडून कोणतीही विशिष्ट माहिती मिळालेली नाही. आमच्या बाजूने, कॅनडामध्ये राहणार्‍या काही लोकांच्या गुन्हेगारी कृत्यांबाबतचे विशिष्ट पुरावे कॅनडासोबत शेअर केले गेले असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT