india, china, ladakh, america 
ग्लोबल

...म्हणून चीनला भारताच्या 10 जवानांना सोडणं भाग पडलं; जाणून घ्या आतली गोष्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- 15 जून रोजी भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षानंतर तीन दिवसांनी चीनने त्यांच्या ताब्यातील 10 भारतीय जवानांना सोडून दिले आहे. संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये लष्करी पातळीवर चर्चा सुरु होती. मात्र, चीन भारतीय जवानांना सोडायला तयार नव्हता. त्यानंतर दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बोलणीनंतर चीनने नरमाईची भूमिका घेतली. तेव्हा कुठे या दहा जवानांना भारताकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. यात 4 भारतीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. 15 जूनच्या रात्री चीन आणि भारतामध्ये हिंसक संघर्ष झाला. यावेळी भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. तसेच चीनने भारताच्या 10 जवानांना ताब्यात घेतले होते. या सैनिकांना सोडण्यात यावे यासाठी दोन्ही देशांमध्ये दिर्घकाळ चर्चा झाली. अखेर तीन दिनसांनी चीनने भारतीय सैनिकांना सोडण्याचा निर्णय घेतला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैनिकांसोबत कोणताही दुर्व्यवहार करण्यात आलेला नाही. भारत आणि चीनमध्ये गालवान खोऱ्यावरुन वाद आहे. 15 जून रोजी गालवान नदीच्या दक्षिणी भागात धुमश्चक्री झाली. गालवान नदी पूर्वकडून पश्चिमीकडे वाहते आणि श्लोक नदीला जाऊन मिळते. सीमेवरील प्रेट्रोलिंग प्रोटोकॉलनुसार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) संघर्षानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या सैनिकांना लवकरात लवकर परत केले जाते. 2013 मध्ये एक चिनी अधिकारी डोंगरावरुन खाली पडला होता. त्यावेळी भारतीय सैनिकांनी त्याचा जीव वाचवला होता. तसेच त्याच्यावर रात्रभर उपचार करुन चीनच्या ताब्यात देण्यात आले होते. चीनने भारतीय सैनिकांना सोडले असले तरी दोन्ही देशांमधील चर्चा सुरुच आहे.

चीनने गालवान खोऱ्यातून मागे जावं, तसेच या भागात पीपल्स लिबरेशन आर्मीचे तंबू काढले जावेत अशी मागणी भारताने चीनकडे केली आहे. मात्र, चीनची मुजोरी कायम असून गालवान हा आमचा भाग असल्याचं म्हटलं आहे. तसेच भारतीय जवानांच्या घुसखोरीमुळेच आम्हाला हिंसक पवित्रा घ्यावा लागला असं चिनी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि त्यांचे चिनी समपदस्थ यांच्यात दूरध्वनीद्वारे चर्चा झाली. त्यानंतर चीनने जवानांना भारताकडे सुपूर्द केले आहे. मात्र, चीनने भारतीय सैनिकांना कशामुळे ताब्यात घेतले होते, याचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, या काळात भारतीय जवानांवर कोणताही अत्याचार करण्यात आला नाही, असं सूत्रांकडून कळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT