Taliban Spokesperson Muhammed Suhail Shaheen 
ग्लोबल

भारतीय सैन्य इथे आल्यास चांगलं होणार नाही; तालिबानची धमकी

कार्तिक पुजारी

अफगाणिस्तानवरील (Afghanistan ) आपली पकड तालिबानने मजबूत केली आहे. या पार्श्वभूमीवर तालिबानचे प्रवक्ते मुहम्मद सोहेल शाहीन (Taliban Spokesperson Muhammed Suhail Shaheen) यांची एएनआय या वृत्तसंस्थेने मुलाखत घेतली आहे

काबुल- अफगाणिस्तानवरील (Afghanistan ) आपली पकड तालिबानने मजबूत केली आहे. या पार्श्वभूमीवर तालिबानचे प्रवक्ते मुहम्मद सोहेल शाहीन (Taliban Spokesperson Muhammed Suhail Shaheen) यांची एएनआय या वृत्तसंस्थेने मुलाखत घेतली आहे. यावेळी मुहम्मद सोहेल शाहीन यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. जर भारत देशात आला आणि अफगाण सैन्याला मदत करण्याचा प्रयत्न केला तर ती त्यांच्यासाठी चांगली गोष्ट नाही. इतर देशांनी अफगाणिस्तानमध्ये सैन्य आणल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली हे त्यांनी पाहिलं असेल. हे सगळं सर्वांसमोर आहे, असं ते म्हणाले आहेत. एकप्रकारे शाहीन यांनी भारताला इशारा दिला आहे.

भारतीय प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधींची भेट घेत असल्याची चर्चा आहे. पण, अशी कोणतीही भेट झाली नाही, पण काल डोहाच्या बैठकीमध्ये भारतीय प्रतिनिधी सहभागी झाले होते, असं शाहीन म्हणाले. अफगाण भूमि भारतविरोधी कारवायासाठी वापरी जाणार नाही याची काय खात्री आहे, असा सवाल शाहीन यांना करण्यात आला. यावर ते म्हणाले की, 'आमची भूमि इतर देशांविरोधात वापरु न देण्यासाठी आम्ही बांधिल आहोत.'

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांशी तालिबानचा संबंध आहे का? असा प्रश्न शाहीन यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की,' 'हे आरोप निराधार आहेत. याला कोणताही पाया नाही. केवळ राजकीय हेतूने हे आरोप केले जात आहेत.' आमच्याकडून कोणत्याही दूतावास किंवा प्रतिनिधींना धोका नाही. आम्ही दूतावास आणि प्रतिनिधींवर हल्ला करत नाही, असं शाहीन म्हणाले.

भारताने अफगाणिस्तानी लोकांसाठी केलेल्या कामाचे आम्ही कौतुक करतो. भारताने अफगाणिस्तानच्या विकासासाठी अनेक प्रोजेक्ट हाती घेतले आहेत. विकास कामांना पाठबळ देऊन भारत अफगाण लोकांची मदत करत आहे. त्यांचे हे काम नक्कीच चांगले आहे, असं शाहीन म्हणाले. अफगाणिस्तानमधील भारताच्या प्रोजेक्टच्या भविष्याबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT