india america Sakal
ग्लोबल

तेलाच्या व्यवहाराचे राजकारण नको; भारताने अमेरिकेला सुनावले

रशियाकडून कच्चे तेल आयत करण्याच्या भारताच्या निर्णयावर नाराजीचा सूर लावणाऱ्या अमेरिकेला भारताने खडसावले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आर्थिक निर्बंधांचा सामना करणाऱ्या रशियाकडून कच्चे तेल आयत करण्याच्या भारताच्या निर्णयावर नाराजीचा सूर लावणाऱ्या अमेरिकेला भारताने खडसावले आहे. भारताची ऊर्जेची गरज आणि त्यासाठी होणाऱ्या कायदेशीर व्यवहारांचे कोणीही राजकारण करू नये, अशा खरमरीत शब्दांत भारताने खडसावले आहे. हा निर्णय अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन करणारा नसला तरी जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाला चुकीच्या बाजूने ढकलणारा असल्याची इतिहासात नोंद होईल, अशी टीका अमेरिकेने केली होती.

अमेरिकेच्या टीकेवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘तेल उत्पादनात स्वयंपूर्ण असलेल्या किंवा रशियाकडून स्वतः कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांनी, भारत-रशिया यांच्यातील व्यापारावर निर्बंधाचा हवाला देणे योग्य नाही. भारताची ऊर्जेची गरज आणि त्यासाठी होणाऱ्या कायदेशीर व्यवहारांचे कोणीही राजकारण करू नये,’ असे भारताने सुनावले. ऊर्जेची गरज भागविण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते.

तब्बल ८५ टक्के कच्चे तेल म्हणजेच दिवसाला ५० लाख पिंप कच्चे तेल आयात केले जाते. यातील बहुतांश आयात ही पश्चिम आशियातील देशांकडून होते. त्यात इराककडून २३ टक्के, सौदी अरेबियाकडून १८ टक्के आणि संयुक्त अरब अमिरातीकडून ११ टक्के तेल आयात केले जाते. याखेरीज ७.३ टक्के कच्चे तेल आयातीची गरज अमेरिकेकडूनही भागविली जाते. यंदाच्या वर्षात अमेरिकेकडून कच्चे तेल आयातीचे प्रमाण अकरा टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचण्याचे अपेक्षित आहे. मात्र सध्याच्या भूराजकीय घडामोडींनी भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसमोर आव्हाने उभी केली आहेत.

रशियाकडून अत्यल्प आयात

युक्रेन-रशिया युद्धाचा आणि त्यामुळे बदललेल्या परिस्थितीचा हवाला देत सरकारी सूत्रांनी सांगितले की, बदललेल्या स्थितीमुळे भारताने इराण आणि व्हेनेझुएला यांच्याकडून तेल आयात थांबविली होती. अन्य पर्याय भारतासाठी महागडे ठरत आहेत. त्यात युक्रेन युद्धाने उर्जा सुरक्षिततेबाबतची भारतासमोरील आव्हाने आणखी वाढविली असून भारताला इतर पर्यायांचा साठी अधिक दाम मोजावे लागत आहेत. भारताच्या कच्चे तेल आयातीच्या पर्यायांमध्ये रशियाचा हिस्सा अत्यल्प म्हणजे एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. एवढेच नव्हे तर भारताच्या प्रमुख दहा तेल पुरवठादार देशांमध्येही रशियाचा समावेश नाही. शिवाय अशा तेल आयातीसाठी दोन्ही देशांची सरकारी पातळीवर कोणतीही व्यवस्थादेखील नाही.

युरोपला मात्र पुरवठा सुरुच

सद्यस्थितीत रशियाचा नैसर्गिक वायू तसेच कच्च्या तेलाचा जगभरात विविध देशांना विशेषतः युरोपातील देशांना पुरवठा सुरू आहे. तर युरोपातील जर्मनी, इटली, फ्रान्स देशांना रशियाचा ७५ टक्के नैसर्गिक वायू निर्यात केला जातो. नेदरलँड, इटली, पोलंड, ब्रिटन, लिथुआनिया, रोमानिया हे युरोपातील देश मोठ्या प्रमाणात रशियाचे कच्चे तेल आयात करतात. या आयातीवर परिणाम होऊ नये यासाठी युक्रेनविरुद्धच्या युद्धानंतर रशियावर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमधून नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल आयात वगळण्यात आली, हे उल्लेखनीय आहे. या आयातीसाठी युरोपीय महासंघाकडून रशियन बँकांमार्फत आर्थिक व्यवहार होत असल्याने या बँकांना स्विफ्ट बँकिंग व्यवस्थेमधूनही वगळण्यात आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT